Nashik Crime News 2026-वाळू उपसा करण्यास विरोध; माजी सरपंचाला मारहाण

संतप्त ग्रामस्थांचे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
Nashik Crime News 2026
सटाणा ताहाराबाद येथील वाळू माफियांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी साक्री शिडीं राष्ट्रीय महामार्गावर ग्रामस्थांनी केलेले सता रोको आंदोलन. (खाया: सुरेश बच्छाव)
Published on
Updated on

सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद येथे अवैध बाळू उपशाला विरोध केल्याच्या कारणावरून वाळू माफियांकडून माजी सरपंचांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २३) संपूर्ण गाय बंद ठेवून राष्ट्रीय महामार्गाचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महसूल अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ताहाराबाद येथून वाहणाऱ्या मोसम नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. वाळू उपशामुळे नदीपात्राजवळील श्रीकृष्ण मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगून या ठिकाणाहून बाळू उत्खनन करू नका असे माजी सरपंच बाळासाहेब शंकर महाजन यांनी संबंधितांना सांगितले असता, त्याचा राग येऊन बाजू माफियांनी त्यांना दमदाटी व मारहाण केली. तसेच एवाभावर न थांबता, पुन्हा एकदा थेट त्यांच्डत घरात घुसून त्यांना जबर मारहाण करण्यात आली.

मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाचा हलविण्यात आले. परंतु या पटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, संबंधित नहळू माफियांना कठोर शासन कराने या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. २३) गावातील व्यवहार बंद टेकले तसेच गावातून जाणाया सत्री-शिडीं राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. स्वयंस्फूर्तीन हजारोच्या संख्येने ग्रामस्थ थेट रस्त्यावर उत्तरल्यामुळे बराच काळ वाहतूक खोळंबली होती तसेच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी डॉ. प्रसाद सोनवणे, काशीनाथ नंदन, सुभाष नंदन, प्रवीण पवार, संदीप साळवे, मिलिंद चित्ते, ज्ञानेश नंदन, दीपक करंकरिया आदींनी ग्रामस्थांच्या वतीने संता भावना व्यक्त केल्या. महसूल अधिकारी मंदाकिनी शेळके यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले तसेच याबाबत वरिष्ठांना भावना कळविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. गावातील इतर अवैध व्यवसायही उत्काल बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Nashik Crime News 2026
Nashik | गोंदेश्वर व मुक्तेश्वर मंदिरात किरणोत्सव

या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वातील हरभजन संजय सोनवणे, छोटू उर्फ हिराजी माणिक सोनवणे आणि रंगनाथ उद्धव पवार या तिघांना अटक करण्यात आली आहे. आंदोलनप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर काळे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Nashik Crime News 2026
Nashik Kumbh Mela | सिंहस्थाच्या कामात अडथळे? नाशिक महापालिकेची सारवासारव; 'सगळं काही आलबेल' असल्याचा दावा

अंतापूरला उत्खनन सुरूच

याच नदीवर अंतापूर शिवारात द्वारकाधीश साखर कारखान्यामागे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन केले जाते. या बेसुमार वाळू उपसामुळे शेजारील विहिवेची पाणी पातळी खालावली असून, शेती धोक्यात आली आहे. मात्र याला विरोध केल्यास दमदाटी आणि मारहाण केली जाते. याबाबत स्थानिक ग्रामस्थ व शेतक-यांनी तहसीलदार तसेच जिल्हाधिकायांकडे वारंवार निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे: मात्र त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे तेथून अजूनही मोतथा प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरूय असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून, यामुळे नाराजी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news