Nashik | गोंदेश्वर व मुक्तेश्वर मंदिरात किरणोत्सव

सिन्नर येथील अनुपम सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
nashik
सिन्नर : मुक्तेश्वर मंदिरात होत असलेला सूर्यकिरणांचा अभिषेक.
Published on
Updated on

सिन्नर : येथील बाराव्या शतकातील अतिप्राचीन व हेमाडपंतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या गोंदेश्वर मंदिर तसेच सिन्नर-शिर्डी रस्त्यावर असलेल्या मुक्तेश्वर मंदिर येथे किरणोत्सव सोहळा सुरू असून, या अद्भुत दृश्याने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत, गेल्या काही दिवसांपासून सूर्योदयावेळी सूर्यकिरणे मंदिराच्या रचनेतून थेट गाभाऱ्यात प्रवेश करीत महादेवाच्या पिंडीवर पडत आहेत.

nashik
Construction Material Price Hike Nashik| बांधकाम साहित्य दरात वाढ : नाशिकमध्ये गृहस्वप्नपूर्ती झाली अवघड

गोंदेश्वर मंदिरात नंदी मंदिरातून येणारी किरणरेषा सभामंडप ओलांडून गाभाऱ्यात पोहोचते, तर मुक्तेश्वर मंदिरातही याचप्रमाणे सूर्यकिरणांचा अभिषेक होत आहे. काही क्षणांसाठी चालणारा हा 'सूर्याभिषेक' भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. या दोन्ही मंदिरांनी शेकडो वर्षांचा इतिहास जपत धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन केले आहे.

सूर्याच्या उत्तरायण दक्षिणायण प्रवासातील विशिष्ट काळातच हा किरणोत्सव अनुभवता येत असल्यामुळे त्याला धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व आहे. या दुर्मीळ सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

nashik
Nashik Simhastha 2027 Controversy - सिंहस्थ कामांवरून भाजप शहराध्यक्षांचाही बॉम्ब

मुक्तेश्वर मंदिराच्या कामाला सुरुवात

तालुक्यातील प्रसिद्ध मुक्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार व विकासकामांना अखेर सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर परिसर सुशोभीकरण, दुरुस्ती तसेच भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. याबाबत स्थानिक नागरिक व भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या कामांमुळे मंदिराचा परिसर अधिक आकर्षक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news