Nashik Monsoon First Rain 2026 | खड्डे, चिखल, राडारोडामुळे नाशिककरांची 'वाट' बिकट

Nashik Monsoon First Rain 2026 | पावसाच्या 'ट्रेलर'ने भरली धडकी : जीव मुठीत धरून करावे लागतेय मार्गक्रमण
Nashik Rain (छाया : हेमंत घोरपडे)
Nashik Rain (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यंदाचा पावसाळा नाशिककरांसाठी प्रचंड त्रासदायक जाणार, हे नव्याने सांगण्याची गरज नसून, मान्सूनच्या पहिल्याच पावसाने त्याबाबतचा 'ट्रेलर' दाखवून दिल्याने नाशिककरांना अक्षरशः धडकी भरली आहे. संबंध नाशिकभर बेसुमारपणे केलेल्या खोदाईमुळे रस्ता शोधणे नाशिककरांना अवघड होत आहे.

Nashik Rain (छाया : हेमंत घोरपडे)
Ketan Agarwal: लोहगड मृत्यू प्रकरणाला नवे वळण; केतन अग्रवाल प्रकरणात संशय वाढला

पावसामुळे रस्ते चिखलात हरविले असून, खड़े पाण्याने तुडुंब भरले आहेत. तर खोदाई करताना रस्त्यातच टाकलेला राडारोडा अपघाताला निमंत्रण देत असल्याने, पावसाळ्यात नाशिककरांना घराबाहेर पहुणे अवघड होईल, असेच काहीसे चित्र दिसून येत आहे. मंगळवारी (दि.२३) पावसाने नाशिकमध्ये दुपारपासूनच हजेरी लावली. काही भागात दम'धार' तर काही भागात संततधार बरसला.

या पावसाने महापालिकेच्या सिंहस्थ विकासकामांचा पर्दाफाश केला. पावसाळ्याअगोदर विकासकामे अंतिम टप्प्यात आणण्यास महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याने, खोदलेले खड़े, चिखल आणि तडारोडा नाशिककरांसाठी तापदायक ठरल्याचे दिसून आले. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने, त्यातून वाट शोधताना नाशिककरांना मोठी कसरत करावी लागली.

Nashik Rain (छाया : हेमंत घोरपडे)
Palghar News | धामटणे कातकरी पाड्यातील सिमेंट रस्त्याला पाच महिन्यांतच तडे

काही भागात तर रस्ता शोधताना किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या. एका चारचाकी चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने, त्याने कार थेट खड्यात घातली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली तसली तरी, कारचे मोठे नुकसान झाले. याशिवाय, रस्त्याच्या कडेला खोदून ठेवलेले मोठमोठे खड़े पाण्याने तुईब भरल्याने, हे खाडे जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याशिवाय, राडारोडा आणि चिखल रस्त्यावर पसरल्याने, त्यातून वाहने चालविणे प्रचंड धोकादायक ठरत असल्याचेही दिसून आले. विशेषतः दुचाकी चालकांना या रस्त्यावर मार्ग शोधताना मोठी कसरत करावी लागली. काही भागात वाहने स्लीप होऊन किरकोळ अपघात झाल्याच्या घटनाही समोर आल्या. दरम्यान, पावसाने दाखवलेल्या या 'ट्रेलर' ने नाशिककरांना धडकी भरविली असून, 'पिक्चर' कसा असेल या विचारानेच नाशिककर चिंतेत सापडल्याची जोरदार चर्चा यानिमित्त रंगत आहे.

खोदकामास मनाई, तरीही खोदकाम सुरूच

१ जूनपासून शहरात खोद‌कामास मनाई करण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले होते. मात्र, त्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरात बेसुमारपणे खोदकाम सुरूच आहे. पाइनलाइन रोडवर जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे. या खोद‌कामाचा राडारोडा रस्त्यावरच टाकला जात असल्याने, रस्ता गायब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना येथून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे येथून वाट आणखीनच बिकट होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news