Nashik Fire Brigade Hydraulic Ladder | 90 मीटर उंचीची हायड्रोलिक शिडी दाखल

Nashik Fire Brigade Hydraulic Ladder |हुतात्मा कान्हेरे मैदानावर अग्निशमनतर्फे प्रात्यक्षिके
Nashik Fire Brigade Hydraulic Ladder
Nashik Fire Brigade Hydraulic LadderFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाढत्या गगनचुंबी इमारतींमध्ये उ‌द्भवणाऱ्या आगीच्या घटनांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी महापालिकेच्या असिशमन विभागाने अत्याधुनिक २० मीटर उंचीची हायड्रोलिक शिडी खरेदी केली आहे. फिनलॅण्डस्थित ब्रान्टो स्कायलिफ्ट या कंपनीकडून खरेदी करण्यात आलेली ही शिडी पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार असून, उंच इमारतींमधील अग्निशमन आणि बचाव कार्यासाठी ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Nashik Fire Brigade Hydraulic Ladder
Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेकडे गंभीर दुर्लक्ष; २५ हजारांहून अधिक इमारतींपैकी फक्त ४८९ संस्थांनीच अहवाल सादर केला

सध्या या शिडीची प्रात्यक्षिके शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर सुरू आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तांत्रिक चाचण्या आणि कार्यक्षमतेची पडताळणी केली जात आहे. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिडीच्या नोंदणी आणि पासिंग प्रक्रियेला विलंब झाला होता. मात्र संप समाप्त झाल्याने आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ही शिडी लवकरच अग्रिशमन विभागाच्या ताफ्यात अधिकृतपणे दाखल होणार आहे.

राज्य शासनाच्या एकिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार महापालिका क्षेत्रात ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी देण्यात येत आहे. नाशिकमध्येही गेल्या काही वर्षांत उंच निवासी आणि व्यावसायिक इमारतींची संख्या वाढत आहे. अशा इमारतींमध्ये आग लागल्यास वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचणे असिशमन दलासाठी मोठे आव्हान ठरते.

Nashik Fire Brigade Hydraulic Ladder
Pimpri Chinchwad Disaster Management: पिंपरी-चिंचवड शहर आपत्ती व्यवस्थापनात किती सक्षम? वाढत्या उंच इमारतींमुळे आव्हाने वाढली

पारंपरिक शिड्या आणि उपकरणांच्या मर्यादांमुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर २० मीटर क्षमतेची हायड्रोलिक शिडी शहराच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेसाठी मोठी ताकद ठरणार आहे. या शिडीच्या मदतीने सुमारे ३० मजल्यांपर्यंतच्या इमारतींमध्ये अग्निशमन दलाला सहज पोहोचता येणार असून, आगीच्या घटनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे अधिक वेगाने आणि परिणामकारकरीत्या शक्य होणार आहे. तसेच उंच इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा आणि बचाव कार्य अधिक कार्यक्षमतेने करता येईल.

आठ वर्षापासून शिडी खरेदीची प्रक्रिया

या शिडीची खरेदी प्रक्रिया २०१८ मध्ये सुरू झाली होती. सुरुवातीला निवड करण्यात आलेली कंपनी दिवाळखोरीत गेल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया काही काळ रखडली होती. त्यानंतर फेरनिविदा प्रक्रियेद्वारे फिनलॅण्डच्या ब्रान्टो स्कायलिफ्ट कंपनीला कंत्राट देण्यात आले. युरोपियन कंपनी असल्यामुळे संपूर्ण व्यवहार युरो चलनात करण्यात आला. या प्रकल्पासाठी अग्निशमन निधीतून सुमारे ३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही रक्कम तारण ठेवून शिडीची खरेदी करण्यात आली आहे.

शहरातील उंच इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता आधुनिक अग्निशमन उपकरणांची आवश्यकता निर्माण झाली होती. ९० मीटर उंचीची ही हायड्रोलिक शिडी सेवेत आल्यानंतर शहराच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेला मोठे बळ मिळणार असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या जीविताचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

- संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news