Illegal Perfume Factory | नाशिकमध्ये विनापरवाना परफ्यूम कारखान्यावर FDA चा छापा; 54 लाखांचा साठा जप्त

Illegal Perfume Factory | नाशिकरोड जवळील नांदूर गावात विनापरवाना परफ्यूम व सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Types of Perfume
Types of PerfumeCanva
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड जवळील नांदूर गावात विनापरवाना परफ्यूम व सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाच्या परिमंडळ दोनच्या पथकाने गुरुवारी (दि. २६) संबंधित कारखान्यावर छापा टाकत तब्बल ५४ लाख ५१ हजार रुपये किमतीचा परफ्यूमचा साठा जप्त केला. यात ३ हजार ३५२ बाटल्यांचा समावेश आहे.

Types of Perfume
Nashik Police Transfer | नाशिक शहर पोलिस दलात मोठे फेरबदल! आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

सप्तशृंगीनगर येथील मे. डिजिप्रेन्युअर रिटेल प्रा. लि. या आस्थापनात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्राथमिक पडताळणी केली असता, तेथे उत्पादित करण्यात येणाऱ्या परफ्यूमच्या पॅकिंगवर उत्पादन परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळले.

त्यामुळे पथकाने पंचांच्या उपस्थितीत छापा टाकून संपूर्ण साठ्याचा पंचनामा केला आणि तो जप्त केला. जप्त केलेल्या परफ्यूमचे नमुने पुढील तपासणी व विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. संबंधित उत्पादक, उत्पादन प्रक्रिया तसेच उत्पादन परवान्याची वैधता याबाबत सखोल तपास सुरू आहे.

Types of Perfume
Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

तपासाअंती कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (औषधे) अशोक बर्डे, सहायक आयुक्त सुरेश देशमुख व चंद्रकांत मोर यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक विकास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महिनाभरात एक कोटीचा अवैध साठा जप्त

दरम्यान, एफडीएचा अन्नविभाग खाद्यपदार्थांवरील कारवाईसाठी सक्रिय असतानाच औषध विभागानेही अवैध उत्पादन आणि विक्रीविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या महिनाभरात औषध विभागाने सुमारे एक कोटी रुपयांचा अवैध साठा जप्त केला आहे. यापूर्वी टक्कल पडलेल्या ठिकाणी केस उगविण्याचा दावा करून विक्री करण्यात येणाऱ्या व्ही. एस. ऑइलच्या विक्रेत्यांवर कारवाई करत ५६ लाख रुपयांचा साठा ताब्यात घेतला होता. त्यानंतर आता विनापरवाना परफ्यूम उत्पादनाविरोधात मोठी कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.