Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

थकबाकीच्या वादात आरोग्यसेवांना खीळ; महालॅब्सची प्रयोगशाळाही ठप्प!
Aapla Dawakhana
Aapla Dawakhanapudhari photo
Published on: 
Updated on: 

अदिती कदम

मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आर्थिक थकबाकीचा फटका बसू लागला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि महालॅब्सच्या प्रयोगशाळा सेवांवर आर्थिक संकटाचे सावट निर्माण झाले आहे.

राज्य सरकारकडून देयके मिळत नसल्याने एचएलएल लाइफकेअर लिमिटेडने ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांतील आपला दवाखाना सेवा २ नोव्हेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, महालॅब्सच्या प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रयोगशाळा सेवाही याच कारणामुळे बंद करण्यात आल्या आहेत.

Aapla Dawakhana
Maharashtra FDA Action: राज्यभरात शाळांच्या परिसरातील ६९ उपाहारगृहे आठ महिन्यांत बंद!

एचएलएल लाइफकेअरने २ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात एप्रिल २०२५ पासूनची देयके प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत एकूण ८१ कोटी ८२ लाख १७ हजार १८३ रुपयांची थकबाकी असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या आर्थिक अडचणीमुळे प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या ७०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास विलंब होत असून, औषधे, वैद्यकीय साहित्य आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या पुरवठादारांची देणीही थकली आहेत. त्यामुळे आवश्यक औषधे आणि साहित्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे कंपनीने पत्रात नमूद केले आहे.

थकबाकीमुळे चार हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात अडचणी येत असून, तपासणीसाठी आवश्यक अभिकर्मके, चाचणी संच आणि अन्य साहित्य पुरवणाऱ्या विक्रेत्यांची देणीही थकली आहेत. परिणामी, २ नोव्हेंबरपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रयोगशाळा सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

Aapla Dawakhana
Mumbai Narcotics Seizure: लोकमान्य टिळक टर्मिनसवर १२ किलो चरस जप्त; दोघांना अटक

दरम्यान, एका बाजूला आपला दवाखाना सेवा पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी दुसरीकडे महालॅब्सच्या प्रयोगशाळा सेवा बंद राहिल्याने सरकारी आरोग्य संस्थांमधील रुग्णांच्या तपासण्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक थकबाकीच्या वादात सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्यसेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

महालॅब्सची प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सेवा बंद

दुसरीकडे, राष्ट्रीय मोफत प्रयोगशाळा निदान सेवा अर्थात महालॅब्सच्या कामकाजावरही थकबाकीचा परिणाम झाला आहे. फेब्रुवारी २०२५ पासून देयके मिळाली नसून, सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत सुमारे ८७७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे एचएलएलने संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये २०१७ पासून प्रयोगशाळा तपासणी सेवा पुरवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.