Nashik Police Transfer | नाशिक शहर पोलिस दलात मोठे फेरबदल! आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Nashik Police Transfer | पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २७ नोव्हेंबरला यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
Nashik Police
Nashik PolicePudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नवीन कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २७ नोव्हेंबरला यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

Nashik Police
Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

या फेरबदलामुळे शहरातील विविध पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदेशानुसार, पोलिस निरीक्षक अविनाश नडविनकेरी यांची अंबड पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखा युनिट २ येथे प्रभारी जबाबदारीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला पोलिस निरीक्षक काजल मोरे यांची इंदिरानगर पोलिस ठाण्यातून अंबड पोलिस ठाण्यात दुय्यम जबाबदारीवर नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पंकज अशोक बैसाणे यांची देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक धीरज गवारे यांची म्हसरूळ पोलिस ठाण्यातून सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांची मुंबईनाका शहर वाहतूक शाखा युनिटमधून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

पोलिस उपनिरीक्षक अफरोज जब्बार शेख यांची मुंबईनाका पोलिस ठाण्यातून सायबर पोलिस ठाण्यात, तर पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन यांची पीसीबी-एमओबी शाखेतून एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

Nashik Police
Nashik Bomb Threat | नाशिक जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सहावा मजला उडवण्याचा ई-मेल

या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन कामकाजाच्या ठिकाणी तत्काळ हजर होऊन कार्यभार स्वीकारावा, त्याबाबतचा अनुपालन अहवाल पोलिस आयुक्तालयास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित ठिकाणी तात्पुरता कार्यभार सोपवण्याबाबतचा निर्णय प्रभारी अधिकारी घेणार आहेत. या आदेशामुळे शहर पोलिस दलातील विविध विभागांच्या कामकाजात बदल होणार आहे. आगामी काळातील प्रशासकीय नियोजनाच्या दृष्टीने या फेरबदलाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.