Nashik Division SSC Result 2026 | दहावीच्या निकालात पुन्हा 'लेकी' सरस! नाशिक विभागाचा निकाल 90.93 टक्के; मुलींची गरुडझेप

Nashik Division SSC Result 2026 | नाशिक विभागाचा निकाल 90.93 टक्के
नाशिक
नाशिक विभागाचा निकाल 93.04 टक्के लागला(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र अर्थात दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये नाशिक विभागाने ९०.९३ टक्के निकालाची नोंद करत राज्यातील नऊ विभागांमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे.

नाशिक
Ashok Kharat case: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! रुपाली चाकणकर आज SIT समोर; चौकशीत होणार मोठे खुलासे?

यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत निकालात आघाडी कायम राखली आहे. विभागात मुलांचा निकाल ८८.०४ टक्के तर मुलींचा निकाल ९३.४९ टक्के इतका लागला आहे. नाशिक विभागातून यंदा एकूण २ लाख १ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ९६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

यातून १ लाख ८१ हजार १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, यासाठी मंडळाने यंदा प्रमुख विषयांच्या लेखी परीक्षांमध्ये किमान एका दिवसाचा खंड ठेवत वेळापत्रक तयार केले होते. तसेच अकरावीचे वर्ग लवकर सुरू व्हावेत आणि पुरवणी परीक्षा वेळेत घेता याव्यात, यासाठी परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस आधी घेण्यात आली होती. त्यामुळे निकाल प्रक्रियेलाही वेग आला असून, विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळणार आहे.

राज्यातील निकालात कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह प्रथम क्रमांक मिळवला असून, छत्रपती संभाजीनगर विभागाचा सर्वात कमी ८८.१४ टक्के निकाल लागला आहे. नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्याने ९३.७१ टक्क्यांसह आघाडी घेतली असून, त्या खालोखाल नाशिक जिल्ह्याचा निकाल ९२.६६ टक्के, धुळे ९२.०५ टक्के, तर जळगाव जिल्ह्याचा निकाल ८५.२५ टक्के लागला आहे.

नाशिक जिल्ह्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्राने ९६.०१ टक्के निकालासह उल्लेखनीय यश मिळवले. येवला तालुक्याचा निकाल ९५.९० टक्के लागला असून, सटाणा ९३.६८, सिन्नर ९३.६०, पेठ ९२.२५ तर दिंडोरी तालुक्याचा निकाल ८९.३९ टक्के आहे. मालेगाव महापालिका क्षेत्राचा निकाल ८८.८५ टक्के लागला.

धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्याने ९५.३५ टक्क्यांची कामगिरी केली तर नंदुरबार जिल्ह्यात घडगाव तालुका ९५.७७ टक्क्यांसह अव्वल राहिला. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्याचा निकाल ९२.५७ टक्के लागला असून भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव आणि यावल भागातील निकाल तुलनेने कमी राहिल्याचे स्पष्ट झाले. यंदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती.

विभागीय मंडळ स्तरावरही जिल्हानिहाय समुपदेशक नेमण्यात आले होते. परीक्षाकाळात नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन केल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. अनेक तालुक्यांनी ९० टक्क्यांहून अधिक निकाल नोंदविल्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा तणाव लक्षात घेता राज्य मंडळाने समुपदेशन सेवाही सुरू ठेवली असून, विद्यार्थ्यांना पुढील आठ दिवस सकाळी ८ ते रात्री या वेळेत ८ निःशुल्क मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नाशिक
Nashik TCS Case | नाशिक टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने नोंदवली गंभीर निरीक्षणे: सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे केला सादर

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरू

SION OOP NO दहावीच्या निकालानंतर विद्याथ्यर्थ्यांना मानसिक आधार व मार्गदर्शन मिळावे यासाठी महाराष्ट्र स्टेट माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विशेष समुपदेशन सेवा सुरू केली आहे. राज्य मंडळाने नियुक्त केलेले समुपदेशक निकालाच्या दिवसापासून पुढील आठ दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना व पालकांना दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

निकालाबाबतची भीती, पुढील प्रवेशप्रक्रिया, अभ्यासक्रम निवड, अपयशानंतरचे पर्याय आणि मानसिक तणाव यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समुपदेशनासाठी ९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ८१६९२०२२१४, ९३७१६६१२५५, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८ आणि ९४०४७८३९९६ हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news