Illegal Liquor Sale Ban | खर्डे ग्रामसभेचा अवैध दारूविक्री बंदीचा ठराव; ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन

खर्डे गावात मोठ्या प्रमाणावर गावठी दारूसह देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री
Liquor Ban
Liquor Ban Pudhari File Photo
Published on
Updated on

Deola Taluka Kharde Illegal Liquor Sale Ban

देवळा : देवळा तालुक्यातील खर्डे येथे सुरू असलेली अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्यात यावी, या मागणीचा ठराव नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी २६ रोजी पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

तालुक्याच्या अतिदुर्गम पश्चिम भागातील खर्डे गावात मोठ्या प्रमाणावर गावठी दारूसह देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाढत्या अवैध दारूविक्रीमुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून, अनेक तरुण व्यसनाधीन होत असल्याने कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Liquor Ban
Nashik Dam Water Crisis| उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणीबाणी! 5 लाख नागरिकांची तहान भागवण्यासाठी 226 टँकर मैदानात

अवैध दारू विक्रेत्यांवर कोणाचाही वचक राहिला नसल्याने त्यांची मुजोरी वाढत चालली असून, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले, तरी हा निर्णय केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा विशेषतः महिला वर्गातून व्यक्त करण्यात आली.

Liquor Ban
Nashik TCS Case | नगरसेवक मतीन पटेलची चौकशी

यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय जगताप, सरपंच जिभाऊ मोहन, किशोर जगताप, माजी उपसरपंच राहुल देवरे, संदीप पवार, भास्कर जाधव, जितू पवार, विजय देवरे, सुहास देवरे तसेच पोलीस पाटील भारत जगताप आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news