Nashik Dam Water Crisis| उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणीबाणी! 5 लाख नागरिकांची तहान भागवण्यासाठी 226 टँकर मैदानात

Nashik Dam Water Crisis| जिल्ह्यातील मोठे व मध्यम अशा एकूण २६ प्रकल्पांमध्ये सध्या २०,४७७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, तो एकूण क्षमतेच्या २९ टक्के आहे.
Washim city faces 5-day water crisis
वाशिम शहरावर 5 दिवसांचे जलसंकट, दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा ठप्पfile photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील मोठे व मध्यम अशा एकूण २६ प्रकल्पांमध्ये सध्या २०,४७७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, तो एकूण क्षमतेच्या २९ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जिल्ह्यातील धरणांमध्ये १६,५६३ द.ल.घ.फू. (२३.४५ टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा पाणीसाठ्यात सुमारे ५.५५ टक्क्यांची वाढ असली तरी ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

Washim city faces 5-day water crisis
MLC Election 2026: नाशिक विधान परिषदेसाठी उमेदवार ठरेना; इच्छुकांच्या मुंबई-जळगाव वाऱ्या

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांतील जलसाठा झपाट्याने घटला आहे. काही धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ तर काही धरणांतील साठा चिंताजनक स्थितीत आहे. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहातील एकूण पाणीसाठा ४५.३९ टक्के असून, गेल्या वर्षी तो ३३.१९ टक्के होता.

गौतमी-गोदावरी धरणात तब्बल ७६.९८ टक्के, तर काश्यपी धरणात ४५.९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र आळंदी धरणात केवळ ७.२३ टक्के साठा शिल्लक आहे. गिरणा खोऱ्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये ७,५३० द.ल.घ.फू. (३२.६५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गिरणा धरणात ३१.३६ टक्के, तर चणकापूर धरणात ३९.३९ टक्के जलसाठा आहे. केळझर धरणातील साठा ४८.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांची

स्थिती जिल्ह्यात ७ मोठे आणि १९ मध्यम प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ७०,६१९ द.ल.घ.फू. असून, त्यापैकी २०,४७७ द.ल.घ.फू. पाणी उपलब्ध आहे. सध्या कोणत्याही प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याने उपलब्ध जलसाठा जपून वापरण्यावर भर दिला जात आहे.

काही धरणांतील साठा अत्यल्प

जिल्ह्यातील काही प्रकल्पांमध्ये मात्र पाण्याची स्थिती चिंताजनक आहे. वाघाड धरणात २.४३ टक्के, पूर्णगाव धरणात ४.३३ टक्के, पुनद धरणात ६.०५ टक्के, टक्के धरणात ८.५५ टक्के आणि भाम धरणात ८.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. माणिकपुंज धरण पूर्णपणे रिकामे असून, त्यात उपयुक्त साठा शून्य आहे.

354 गावांना पाणीटंचाईचा फटका

नाशिक जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील तब्बल ३५४ गावांमध्ये सध्या पाणीटंचाई निर्माण झाली असून, सुमारे २ लाख १२ लोकसंख्येला हजार ८९ प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी १२५ टँकर कार्यरत असून, दररोज २५६ फेऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पोहोचविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल आणि पारंपरिक जलस्रोत कोरडे पडू लागल्याने टँकरची मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाणीवापर टाळावा, गळती रोखावी आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी मे महिन्यात जिल्ह्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा तुलनेने परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी तापमान वाढ कायम राहिल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Washim city faces 5-day water crisis
Air India Flights Cancelled | गोव्याच्या पर्यटनाला विमान कंपन्यांचा मोठा धक्का! जूनच्या वेळापत्रकातून एअर इंडियाच्या अनेक फेऱ्या रद्द

२२६ टँकरवर विभागातील पाच लाख नागरिकांची तहान

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना उत्तर महाराष्ट्रातील धरणसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. परिणामी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील सुमारे पाच लाख नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याची स्थिती सर्वाधिक गंभीर बनली आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात तब्बल २ लाख ५७४ नागरिकांना पाणीटंचाईचा फटका बसत असून, त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ११८ टैंकर धाव घेत आहेत. त्या मानाने नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाई पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही.

पण, पावसाळा अद्याप लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने आगामी काही दिवसांत टंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये मिळून तीन लाखांहून अधिक नागरिक पाण्याअभावी त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील गावांसह वाड्या-वस्त्यांमध्ये परिस्थिती अधिक बिकट झाली असून, महिलांना आणि शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. सध्या विभागातील २७१ गावे आणि ८३४ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १०२ विहिरी गावांसाठी तर ८९ विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र वाढते तापमान आणि घटता पाणीसाठा यामुळे उपलब्ध उपाययोजनाही अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news