

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून तरुणाशी संपर्क साधून मैत्री व प्रेमाचे आमिष दाखवून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये जादा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणीने ५३ लाख रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याची घटना घडली आहे.
या बाबत तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार तो नाशिक येथे राहतो. त्याच्याशी सानवी खुराणा नामक तरुणीने फेसबुक प्रोफाईल व वेगवेगळ्या व्हॉट्सप क्रमांकांद्वारे संपर्क साधत त्याला मैत्री व प्रेमाचे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले.
त्यानंतर तरुणीने क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट मिळवून देण्याच्या नावाखाली एक बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते ओपन केल्याचे भासविले. tcoin B BATA sensisent per त्यानुसारवरील नमूद टेबलप्रमाणे व्हॉट्सपद्वारे पाठविलेल्या विविध यूपीआयडी व युनिटी स्मॉल फायनान्सच्या व खात्यावर फोन पे आरटीजीएसद्वारे पैसे भरण्यास भाग पाडले.
त्यानंतर नमूद प्लॅटफॉर्मवर आभासी पद्धतीने ही रक्कम कोट्यवधींच्या स्वरूपात वाढलेले असल्याचे भासविले. त्यानंतर या रकमेकरिता वेळोवेळी तरुणीच्या सुबान गुरू यांचे ट्रेडिंग कमिशन प्रतिदिवसाला एकूण ३० टक्के रकमेकरिता असे गुंतवणूक व कमिशनकरिता एकूण ५२ लाख ९३ हजार २२८ रुपये भरण्यास भाग पाडले.
क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग खात्यावरील रक्कम डेबिट करण्यासाठी पुन्हा ३४ लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, हे पैसे भरण्यास फिर्यादीने नकार दिला. त्यामुळे संशयित तरुणीने दोघांच्या संमतीने एकमेकांस अश्लील फोटो व व्हिडिओ पाठविले होते.
हे फोटो व व्हिडिओ पुन्हा व्हॉट्सपवर पाठवून शिवीगाळ करून फिर्यादीला मारून टाकण्याची धमकी दिली तसेच ५३ लाख रुपयांची फसवणूक करून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केला. हा प्रकार १८ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान ऑनलाइन इंटरनेट व्हॉट्सप व फेसबुकवर घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात सानवी खुराणा नामक तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे अधिक करीत आहेत.