Nashik Crime | धक्कादायक ! प्रियकराकडून प्रेयसीच्या चिमुकल्याचा खून

उलटी केल्याचा राग आल्याने सिलिंडरवर आपटले डोके
Nashik Crime
संशयित महेश कुंभारPudhari Photo
Published on
Updated on

पंचवटी : पतीपासून विभक्त होऊन लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या मुलाने उलटी केल्याचा राग आल्याने प्रियकराने चार वर्षीय मुलाचे सिलेंडर डोके आपटून त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंचवटीतील कृष्ण नगर भागात ही घटना घडली असून पुणे जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी बुधवार दि.०३ रोजी पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात १०३ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटना ही नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने दि. ०४ रोजी वर्ग करण्यात आला आहे. सदर घटनेनंतर पंचवटी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून वेदांश विरभद्र काळे (४) मयत चिमुरड्याचे नाव आहे.

Nashik Crime
Nashik Bribe News | लाचखोर विपणन व्यवस्थापकास पोलिस कोठडी

या बाबत अधिक महिती अशी की, लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळची महिला पल्लवी विरभद्र काळे हिला दोन मुली व एक मुलगा असे तीन अपत्य असून गेल्या सात महिन्यांपासून पल्लवी पतीतून विभक्त राहत होती. तिचे लातूर येथील महेश कुंभार याच्या बरोबर प्रेम जुळल्याने महेश समवेत पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील कृष्ण नगर येथे खोली घेऊन राहत होती. रविवारी (दि.०१) रात्री अकरा वाजता घरात प्रियकर महेश कुंभार मुलगा वेदांशला चपाती खाऊ घालत होता. त्यावेळी वेदांशने उलटी केली. त्याचा राग आल्याने महेशने वेदांशला चापट मारली व त्याचे डोके गॅस सिलिंडरवर आपटले. मोठी मुलगी समृद्धीने मामाने पिल्याला खूप मारल्याचे सांगितल्याने पल्लवी महेशला ओरडली. तर वेदांशला बेदम मारहाण झाल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे प्रकृती गंभीर असल्याने त्यास रात्री बसने पुणे जिल्ह्यात कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

सदर घटनेनंतर बिबवेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित महेश कुंभार पंचवटीतील कृष्ण नगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी महेशला ताब्यात घेतले आहे. तर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग झाल्याने पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे.

Nashik Crime
जळगाव : बनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या तिघांना अटक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news