जळगाव : बनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या तिघांना अटक

भुसावळ येथे कारवाई; ३ लाखांच्या बनावट नोटा जप्त
Three arrested in fake currency case
बनावट नोटा प्रकरणी तिघांना अटक केली.
Published on
Updated on

जळगाव : भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना बुधवारी (दि.४) सायंकाळी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाखाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सय्यद मुशारद अली मुमताज अली (वय ३८, रा. दुश्मनीय पार्क शिवाजीनगर जळगाव), नदीम खान रहीम खान (वय ३,० रा. सुभाष चौक शनिवार पेठ जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कादर (वय ५७, अब्दुल अमित चौक रसलपुर रोड रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

Three arrested in fake currency case
माेठी बातमी : आप आमदार अमानतुल्ला खान यांना अटक

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काहीजण भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येत आहेत, अशी गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. नुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथक तयार करून भुसावळ शहरात सापळा रचला. व बनावट नोटांसह बुधवारी तिघांना अटक केली. संशयित एक लाखाच्या खर्‍या नोटांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याने पोलिसांनी पूर्ण तयारी केली होती. बुधवारी सायंकाळी संशयितांनी तीन ठिकाणे बदलल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण झाल्यावर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा स्टेट बँकेच्या अधिकार्‍यांकडून नोटांचे व्हेरिफिकेशन करण्यात आले.

Three arrested in fake currency case
Nashik Crime News | मोकाट जनावरावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news