Nashik Bribe News | लाचखोर विपणन व्यवस्थापकास पोलिस कोठडी

लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले
Nashik Bribe News Vishal Talwadkar
लाचखोर विपणन व्यवस्थापकास पोलिस कोठडी pudhari photo
Published on
Updated on

नाशिक : डेअरी कंपनी व्यवस्थापनाकडे कंपनीच्या ब्रँडसाठी ॲगमार्कनुसार परवानगी देण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भारत सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील कार्यालयातील वरिष्ठ विपणन अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले. विशाल तळवडकर असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने गुरुवार (दि. ५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Nashik Bribe News Vishal Talwadkar
बोगस कॉल्स, मेसेजेसपासून 95 टक्के लोक त्रस्त

दत्त मंदिर परिसरात दूरसंचार इमारतीत ॲगमार्क कार्यालयात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. २) ही कारवाई केली. धुळे येथील दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपनीस ब्रॅंडसाठी लोगो पाहिजे होता. त्यासाठी त्यांनी ॲगमार्ककडे अर्ज केला होता. मात्र पणन व तपासणी संचालनालयातील वरिष्ठ विपणन व्यवस्थापक तळवडकरने तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. त्यानुसार सोमवारी लाच घेताना संबंधित अधिकाऱ्याला पथकाने पकडले. विभागाने तळवडकरच्या निवासस्थान आणि कार्यालय परिसरात झडती घेतली. काही कागदपत्रे जप्त केली असून, त्यांची छाननी सुरू केली आहे. दरम्यान, न्यायालयाने विशाल तळवडकर याला पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात इतर संशयितांचा सहभाग आहे का याचीही तपासणी विभाग करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news