Nashik Crime I तिने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

Nashik Crime I तिने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील पचितराय बाबानगरमध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. घोटी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपीसह घटनेत सहभागी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. प्रेससंबंधात पती अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला असल्याची माहिती घोटी पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरापासून हाकेच्या अंतरावर रेल्वे लाइनच्या बाजूला शुक्रवारी (दि. २६) तरुणाचा खून करण्यात आला होता. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात अनोळखी इसमाचा मृत्यू बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुकणे येथील रुपेश संतू साबळे (४२ ) हा गेल्या सहा महिन्यांपासून घोटीत राहण्यासाठी आला होता. रुपेश याची पत्नी सविता (३२) शहरातील एका खासगी रुग्णालयात कामाला होती. शहरातील माधव कडू (२५) याचे सविता हिच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याने व प्रेमात पती रुपेश याचा अडसर येत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून माधव हा कट शिजवत होता. रुपेश हा कायम मद्यधुंद राहत असल्याने पत्नीचे व त्याचे पटत नव्हते. संसारात माधव हा कायम आर्थिक सहकार्य करीत असल्याने माधव व सविता यांच्यातील अनैतिक संबंधाची कुणकुण रुपेश यास लागल्याने तो माधव यास शिवीगाळ करीत असत. याचा सर्व राग अनावर होऊन रुपेशबरोबर माधव याने मैत्री करत त्याला दारू पाजून खूश करू लागला.

मनात मात्र वेगळेच असल्याने त्याने घटनास्थळी दोनदा दारू पिवून मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र रुपेश हा सावध असल्याने त्याचा कट साधला नाही. मात्र, दि. २५ रोजी माधव याचा दुकानातील जोडीदार गोरख कडू (३०) याने रुपेश यास बोलवत प्रचंड दारू पाजली. याचदरम्यान रुपेश मद्यधुंद अवस्थेत झोपी गेल्याने त्याच्या पत्नीस फोन लावून विचारले काय करायचे तिने त्यास मारण्यास सांगितले. त्याचवेळी रुपेश याच्या डोक्यात माधव व गोरख याने दगड टाकून कायमचा काटा काढला असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली असून, खुनात सहभागी असलेल्या महिलेस जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे.

खुनाचा असा झाला उलगडा
ज्या दुकानातून दारूची बाटली विकत घेतली त्या बाटलीवरील बॅच नंबर व घटनास्थळी पडलेल्या बाटलीवरील नंबरची कंपनी एकच होती. दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी व मयत हे एकत्र आल्याचे दिसून आल्याने तातडीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित संशयितांना गजाआड केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news