Nashik Crime : पेठरोडवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ३७ जुगाऱ्यांना पकडले

Nashik Crime : पेठरोडवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ३७ जुगाऱ्यांना पकडले
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पेठ फाटा सिग्नलजवळील बी. झेड. प्लाझा इमारतीच्या गाळ्यात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख २८ हजार ७२० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले असून ३७ जुगाऱ्यांना पकडले आहे.

गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार जगेश्वर बोरसे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला. पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहायक उपनिरीक्षक येवाजी महाले, हवालदार योगीराज गायकवाड, नाजिम पठाण, देविदास ठाकरे, विशाल काठे आदींच्या पथकाने सोमवारी (दि.२) कारवाई केली. पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई केल्यानंतर तेथे ३७ जुगारी तिनपत्ती व अंदर-बाहर नावाचा जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सुभाष बाबुराव गायकवाड (३५), सुकदेव निंबाजी अंतुले (३५), निरंजन दिलीप सोमानी (४०) यांच्यासह एकूण ३७ जणांविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news