Nashik Crime | नाशिकमध्ये खळबळ: प्रेम संबंधातून वाद; प्रियकराने विवाहित महिलेला कारखाली चिरडले

वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथे प्रेमसंबंधातून झालेल्या हत्येच्या घटनेने खळबळ
Married Woman Murder Nashik
Married Woman Murder NashikPudhari
Published on
Updated on

Married Woman Murder Nashik

नाशिक : वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथे प्रेमसंबंधातून झालेल्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हॉटेल मिरची रिसॉर्टच्या गेटजवळ रूपाली पाटील यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा प्रियकर दीपक सैंदाणे याला वाडीवऱ्हे पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली पाटील आणि दीपक सैंदाणे हे दोघेही विवाहित असून, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मंगळवारी दोघे कारमधून वाडीवऱ्हे परिसरात गेले होते. यावेळी कारमध्ये दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला.

Married Woman Murder Nashik
Nashik Crime News | अनैतिक संबंधातून पतीचा गळा चिरून खून! नाशिकमधील धक्कादायक घटना; 4 जण जेरबंद

वाद वाढल्यानंतर रूपाली कारमधून खाली उतरल्या. यावेळी संतापलेल्या दीपकने त्यांच्या अंगावर कार घातल्याचा आरोप आहे. कारची धडक बसल्याने रूपाली गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर कार रिसॉर्टच्या लोखंडी गेटवर जाऊन आदळली.

घटनेनंतर सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपासाची दिशा बदलून घटनेची चौकशी केली. तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी दीपक सैंदाणे याला ताब्यात घेऊन अटक केली.

Married Woman Murder Nashik
Nashik Crime News | "नाशिकरोडमध्ये मध्यरात्री टोळीचा धुडगूस! बिल्डरवर गोळीबार अन् मर्सिडीज कारची तोडफोड"

या घटनेमागील नेमके कारण, दोघांमध्ये झालेल्या वादाचे स्वरूप आणि हत्येचा घटनाक्रम याबाबत वाडीवऱ्हे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news