Nashik Court | 10 लाखांच्या हुंड्यासाठी छळ अन् आत्महत्येला प्रवृत्त; नराधम पतीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Nashik Court | याच प्रकरणातील इतर आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
Court
CourtFile Photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आडगाव पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या विवाहितेच्या छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ च्या न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी हेमंत संजय पगार (पाटील) याला दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे. याच प्रकरणातील इतर आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

Court
Nashik Pune Semi High Speed Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेरात जागरण गोंधळ; काकोडकर समितीची मुदत संपली

हा गुन्हा दि. २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान आडगाव परिसरातील बळरामनगर, धात्रक फाटा येथील प्लॉट क्रमांक १३८ येथे घडला होता. मृत सारिका हेमंत पगार (पाटील) यांचा भाऊ केतन दौलत काकुळते यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. प्रकरणात हेमंत संजय पगार (पाटील), मंगलाबाई संजय पगार, संजय पुंडलिक पगार, रमाकांत उर्फ बाबूजी संजय पगार, पोपट गणपत देवरे आणि अनिल बापूराव काकुळते यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.

तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून सारिका यांच्याकडे हुंड्यापोटी १० लाख रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने त्यांना वेळोवेळी टोचून बोलणे, मारहाण करणे तसेच शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला. तसेच हेमंत पगार याचे इतर महिलांशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांच्या कारणावरूनही सारिका यांना त्रास देण्यात आल्याचे तपासात नमूद करण्यात आले.

Court
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका विषय समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर! 8 आणि 9 ऑक्टोबरला रंगणार सभापतीपदाचा संग्राम

या त्रासाला कंटाळून त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन आडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. ए. सदाफुले यांनी केला.
हेमंत पगारला हुंडाबळीच्या गुन्ह्यात १० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड तसेच विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

अन्य पाच आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. भानुप्रिया पेठकर यांनी काम पाहिले. प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, कोर्ट अंमलदार पोलिस हवालदार रंजना गायकवाड आणि आडगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदार संगीता बहिरम यांनी न्यायालयीन पाठपुरावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news