Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका विषय समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर! 8 आणि 9 ऑक्टोबरला रंगणार सभापतीपदाचा संग्राम

Nashik Municipal Corporation | विषय समित्या : सभापती-उपसभापतीपदासाठी ८ व ९ ऑक्टोबरला निवडणूक
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या महिला बालकल्याणसह पाचही विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घोषित केला आहे. महिला व बालकल्याण समिती व शिक्षण समिती सभापती-उपसभापती पदासाठी गुरुवारी, दि. ८ तर शहर सुधारणा, विधी तसेच वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती - उपसभापती पदासाठी ९ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असतील.

Nashik Municipal Corporation
Sumit Pagare Crime Case | राजू शेखसह 3 संशयित आरोपींना कल्याणहून नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महिनाभरापूर्वी या पाचही विषय समित्या सदस्यांच्या नियुक्त्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी महासभेत घोषित केल्या होत्या. महापालिकेतील राजकीय पक्षसंख्याबळाआधारे या समित्यांवर सदस्य नियुक्ती झाल्याने १२२ पैकी सर्वाधिक ७२ नगरसेवकसंख्या असलेल्या सत्तारूढ भाजपने या पाचही समित्यांवर वर्चस्व राखले आहे.

नऊ सदस्यीय समित्यांवर भाजपचे प्रत्येकी पाच, शिवसेना शिंदेचे दोन, तर शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रत्येकी एक सदस्य नियुक्त केला आहे. विधी समितीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष नगरसेवकाला संधी मिळाली आहे.

या समित्यांच्या सदस्य नियुक्ती घोषित झाल्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटला तरी या समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त लाभत नव्हता. महापौरांकडून सदस्य नियुक्तीचा ठराव प्राप्त झाल्यानंतर सभापतीपदाच्या निवडीसाठी नगरसचिव विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे.

अर्ज स्वीकृती ६ ऑक्टोबरला:

विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पाचही समित्यांच्या निवडणुकांसाठी मंगळवारी, दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० दरम्यान नगरसचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. निर्धारीत कार्यक्रमानुसार निवडणूक सभेचे कामकाज स्थायी समितीच्या सभागृहात होईल.

Nashik Municipal Corporation
Nashik Drought | चांदवड अन् नाशिक तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होणार? जिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल!

असा आहे निवडणूक कार्यक्रम:

  • अर्ज स्वीकृती- दि. ६ ऑक्टोबर, सकाळी १० ते दुपारी १२.३० पर्यंत

  • महिला बालकल्याण समिती सभापती निवडणूक- दि. ८ ऑक्टोबर, दुपारी ३.३० वाजता

  • शिक्षण समिती सभापती- दि. ८ ऑक्टोबर, सायंकाळी ५ वाजता

  • शहर सुधार समिती सभापती- दि. ९ ऑक्टोबर, सकाळी १० वाजता

  • विधी समिती सभापती- दि. ९ ऑक्टोबर, सकाळी ११.३० वाजता

  • वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती- दि. ९ ऑक्टोबर, दुपारी १ वाजता

बिनविरोध निवड शक्य:
या पाचही विषय समित्यांवर सत्तारूढ भाजप व शिंदे गटाचे वर्चस्व आहे. प्रत्येकी नऊ सदस्यीय समितीवर भाजपचे पाच व शिंदे गटाचे दोन, असे सात सदस्य असल्यामुळे पाचही समित्यांचे सभापतीपद सत्तारूढ भाजप - शिंदे युतीकडे जाणार हे निश्चित आहे. अल्पमतात असलेल्या विरोधकांना निवडणूक जिंकण्याची संधी नसल्यामुळे या पाचही समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध शक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news