

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या पावसावर 'अल निनो'चा प्रभाव - दिसून येत आहे. जूनमध्ये जिल्ह्यात पावसाचे - प्रमाण सरासरीच्या तुलनेत १०.९ मिलिमीटर - एवढे आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी - पाण्यात येणाऱ्या पिकांची माहिती द्यावी. - अपुऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती - करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष - प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शुक्रवारी (दि. १९) कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक - झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा - अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक भिवा लवटे यांच्यासह - उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी - अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत मान्सूनची सद्यस्थिती, अल निनो - हवामान घटकाचा संभाव्य प्रभाव आणि खरीप हंगामावर त्याचा होणारा परिणाम याविषयी आढावा घेतला गेला. जिल्हाधिकारी प्रसाद - म्हणाले की, पावसाची अचूक आकडेवारी प्राप्त - होण्यासाठी सर्व हवामान केंद्रांची तपासणी - करावी. किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस - होत नाही आणि जमिनीत पेरणीयोग्य ओल - निर्माण होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी पूर्णपणे टाळावी. संपूर्ण क्षेत्रात एकाच वेळी पेरणी न करता टप्प्याटप्प्याने करावी. त्यामुळे आर्थिक जोखीम कमी होईल. दुबार पेरणीची वेळ आल्यास, शेतकऱ्यांनी घरचेच प्रमाणित बियाणे (विशेषतः सोयाबीनचे)
मिश्र पिकांना द्यावे प्राधान्य
यंदा कमी पावसाच्या अंदाजामुळे ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद आणि तीळ यांसारख्या पारंपरिक व कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. पिकांच्या जोखीम व्यवस्थापनासाठी तूर आणि सोयाबीन, बाजरी आणि तूर किंवा कापूस आणि मूग यांसारख्या मिश्र पिकांची पद्धत अमलात आणावी. पेरणीसाठी गादीवाफा पद्धतीच्या वापराविषयी जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाविस्तार एआय अॅपचा वापर करावा
जमिनीतील बाष्पीभवन रोखण्यासाठी पीक अवशेषांचे मल्चिंग करावे. ठिबक व तुषार सिंचनाचा काटेकोर वापर करून शेततळ्यांमध्ये 'संरक्षित सिंचन साठा' राखून ठेवावा. कृषी विभागाच्या अधिकृत महाविस्तार एआय अॅपचा वापर करून शेतकऱ्यांनी हवामान अंदाज आणि आपल्या शंकांचे डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून निरसन करून घ्यावे. टंचाईत फळबागा वाचवण्यासाठी विशेष मोहीम राबवीत कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, असेही प्रसाद यांनी सांगितले.