Nashik NEET Exam | नीट परीक्षार्थीसाठी सिटीलिंकची सेवा

Nashik NEET Exam | नाशिकरोड, तपोवन आगारातून ९ अतिरिक्त फेऱ्या
City Link Nashik
City Link NashikPudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रविवारी (दि. २१) होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) निमित्त विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचता यावे, यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) ने विशेष बससेवेची व्यवस्था केली आहे.

City Link Nashik
Nashik ST Bus Route | 400 बसेस तपोवनातून सोडण्याचे नियोजन

नियमित रविवारच्या बस फेऱ्यांव्यतिरिक्त तब्बल ९ अतिरिक्त बस धावणार असल्याची माहिती सिटीलिंक प्रशासनाने दिली. नीट परीक्षेसाठी शहरातील विविध केंद्रांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, नाशिकरोड आणि तपोवन आगारातून विशेष बस फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

त्यामुळे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांची होणारी गैरसोय टळणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. नाशिकरोड आगारातून पाच अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

City Link Nashik
Mumbai Tunnel Connectivity: मुंबईत भूमिगत वाहतुकीची अंतिम चाचपणी वाहतूक बोगद्यांचे जाळे उभारणार

त्यामध्ये मार्ग क्रमांक २०२ वर नाशिकरोड डेपो -बारदान फाटामार्गे एचपीटीसाठी तीन बसेस, मार्ग क्रमांक २३१ वर नाशिकरोड डेपो जेआयटी कॉलेज मार्गे अशोकनगर, बारदान फाट्यासाठी एक बस आणि मार्ग क्रमांक २०८ वर नाशिकरोड डेपो-ओझर टाउनशिप मार्गे इंदिरानगर, मुंबई नाक्यासाठी एक बस धावणार आहे.

तपोवन आगारातून चार अतिरिक्त बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मार्ग क्रमांक १०४ वर तपोवन - पाथर्डी गाव मार्गे साईनाथनगरसाठी दोन बसेस, मार्ग क्रमांक १०६ वर तपोवन-अमृतानगर मार्गे मुंबई नाक्यासाठी एक बस आणि मार्ग क्रमांक १२९ वर तपोवन-भगूर मार्गे जयभवानी रोडसाठी एक बस उपलब्ध राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news