Nashik Accident News|सिडकोत बसच्या धडकेत एक ठार, एक जखमी
सिडको : ब्रेक फेल झाल्याने खाजगी बसच्या धडकेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा हा अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास सिडकोतील अश्विन नगर परिसरात घडली. या प्रकरणी बसचालक वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश अनपट ( ४६ रा . पाथर्डी फाटा ) हे वडील सुरेश अनपट ( ७५ ,रा.बुरकुले हॉल मागे,सिडको) यांना दुचाकी ने गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास सिडकोतील अश्विन नगर येथून अंबड पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असतांना संभाजी स्टेडियम येथे पाठीमागून आलेल्या बस ने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमध्ये दुचाकी वरील वडील व मुलगा हे गंभीर रित्या जखमी झाले यामध्ये वडील सुरेश धोंडीबा अनपट यांच्या डोक्यास व शरीरावर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर मुलगा उमेश अनपट हा या अपघातात जखमी झाला.
रहदारीचा रस्ता असतानाही अपघात होऊन बराच वेळ झाल्यानंतरही या ठिकाणी ॲम्बुलन्स न आल्याने याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांना मिळाली दराडे यांनी तात्काळ घटनास्थळी जात खाजगी वाहनांमधून जखमी असलेल्या उमेश यास तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस दाखल झाले. याप्रकरणी बस चालक दिलीप गांगुर्डे यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .

