

A pregnant woman and her mother were blown away by a speeding truck
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड परिसरातील मुक्तिधामसमोर ट्रकने दिलेल्या धडकेत आई, गरोदर मुलगी आणि जन्माला न आलेल्या बाळाचा एका क्षणात अंत झाला. मंगळवारी (दि. १९) रात्री ८ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे या परिसरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता भीमराव वाघमारे (५०, रा. नाशिकरोड) आणि त्यांची आठ महिन्यांची गरोदर मुलगी शीतल प्रेमचंद केदारे (२७, रा. मखमलाबाद) या मंगळवारी मुक्तिधामसमोरून रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी बिटको चौकाकडून मालधक्का रोडकडे जाणारा ट्रक (एमएच ०४, ईएल ०४४६)पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता भीमराव वाघमारे (५०, रा. नाशिकरोड) आणि त्यांची आठ महिन्यांची गरोदर मुलगी शीतल प्रेमचंद केदारे (२७, रा. मखमलाबाद) या मंगळवारी मुक्तिधामसमोरून रस्ता ओलांडत होत्या.
त्याचवेळी बिटको चौकाकडून मालधक्का रोडकडे जाणारा ट्रक (एमएच ०४, ईएल ०४४६) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने कारसह दोन रिक्षांना धडक देत रस्ता ओलांडत असलेल्या माय-लेकींना उडविले. या अपघातात सुनीता भीमराव वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या शीतलला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच पोटातील गर्भाचा मृत्यू झाला आणि बुधवारी (दि. २०) शीतलचाही मृत्यू झाला. बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या शीतलसोबत आई आणि येणारे बाळही हिरावून नेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेनंतर मुक्तिधाम परिसरातील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दररोज जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. या प्रकरणी हवालदार आशिष गायकवाड तपास करीत आहेत.
मुक्तिधामसमोर मंगळवारी सायंकाळी घडलेला अपघात म्हणजे मनपा व पोलिस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याबरोबरच अपघातही वाढले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी या विरोधात तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच तीन बळी गेल्याचा आरोप केला जात आहे.