Nashik Accident : वर्षभरात 36 हजार अपघातांत 15 हजार प्रवाशांचा मृत्यू

पुढारी विशेष ! 30 हजार जखमी, प्रति दहा हजार वाहनांमागे सात अपघात
Accident News
Nashik Accident NewsPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : दिलीप सूर्यवंशी

गत वर्षभरात राज्यातील विविध महामार्ग आणि राज्यमार्गांवर झालेल्या 36 हजार 84 अपघातांमध्ये सुमारे 15 हजार 335 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले तर 30 हजार 730 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे.

दळणवळण मंत्रालय आणि सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल आणि रस्ता सुरक्षा समित्यांच्या निरीक्षणानुसार डिसेंबर 2024 मध्ये मोटार वाहनांची संख्या 4.88 कोटी तर प्रति दहा हजार वाहनांमागे सात अपघात अशी नोंदवली गेली. 2015 मध्ये हेच प्रमाण 25 होते. 2024 मध्ये अपघातांच्या संख्येत घट आणण्यात यश आले असले तरी, अद्यापही अपघातांचे प्रमाण मोठे आहे. ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अपघात रोखण्यासाठी दरवर्षी रस्ते सुरक्षा या संकल्पनेवर आधारित पथनाट्य आणि व्याख्याने आयोजित करण्यात येतात तर रस्ते सुरक्षा उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी जानेवारी महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो.

अपघातांची प्रमुख कारणे

  • चालकाची चूक : 80 टक्के अपघात हे चालकाच्या चुकीमुळे होतात. यासाठी चालकांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

  • अतिवेग : सर्वाधिक अपघात आणि मृत्यूमागचे मुख्य कारण वाहनाचा अतिवेग आहे. अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते जे अपघाताला कारणीभूत ठरते. महामार्गांवर सातत्याने वेगावर नियंत्रण ठेवा' चे फलक लावलेले असतात. सूचना दिलेल्या असतात त्यांचे पालन करणे गरजेचे आहे.

  • मद्य प्राशन करून वाहन चालवणे : अनेकवेळा चालक मद्य प्राशान करून वाहन चालवितात. यामुळे वेगावर नियंत्रण राहत नाही, परिणामी वाहनावरील नियंत्रण सुटू अपघात होतो.

  • थकवा/झोपेत वाहन चालवणे : खास करून ट्रक बरोबरच लांब पल्ल्याच्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असते. वाहन चालविताना थकवा किंवा झोप येणे यामुळे चालकाचे मेंदुवरील नियंत्रण सुटते अन‌् रात्री अपरात्री अपघात घडतो.

  • मोबाइल वापरणे : वाहन चालविताना निष्काळजीपणे मोबाइल वापरल्याने ड्रायव्हिंगकडे दुर्लक्ष होते कॉल, मेसेज, सोशल मीडिया यामुळे लक्ष विचलित होते. परिणामी अपघात घडण्याची शक्यता वाढते.

  • वाहन चालविण्याचा अनुभव नसणे : नवे ड्रायव्हर, परवाना नसलेले चालक वाहन चालवितात यामुळे अपघात घडतो.

  • वाहन संबंधित कारणे : ब्रेक, टायर, स्टेअरिंग, हेडलाइट यांची खराब अवस्था यामुळे चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवणे अवघड होते.

  • ओव्हरलोडिंग : वाहतूक शाखेकडून नियमित तपासणी होत नसल्याने अधिक भाड्याच्या हव्यासापोटी वाहनचालकांकडून ओव्हरलोडींग केली जाते. अधिक प्रवाशी आणि अधिक माल भरणे यामुळे वाहन चालविणे अवघड होते.

  • रस्ता व वाहतूक व्यवस्थापनातील कारणे : रात्रीच्यावेळी वाहन चालविताना खड्डे, अंधार, चुकीची वळणे यामुळे अपघात घडतात. याशिवाय वाहतूक नियमांचे पालन न करणे (सिग्नल तोडणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे), रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण, अपुरे वाहतूक चिन्ह (साईन बोर्ड, स्पीड ब्रेकर) आदींमुळेही अपघात घडतात.

  • हवामान व नैसर्गिक कारणे : जोरदार पाऊस, धुके, वादळी वारे दृश्यमानता कमी होते. पावसाळ्यात ओले रस्ते किंवा घसरडे रस्ते तयार होतात यामुळे वाहन घसरुन अपघात होतात.

  • इतर कारणे : पादचारी, सायकलस्वारांचा चुकीचा वापर रस्ता अचानक ओलांडणे, जनावरे, वन्यप्राणी अचानक रस्त्यावर येणे.

शासनाकडून केले जाणारे उपाय

  • सीसीटीव्ही कॅमेरे : वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 36 हजारापेक्षा अधिक कॅमेरे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक याठिकाणी बसविण्यात आले.

  • ई-चलन प्रणाली : वाहतूक नियम मोडणार्‍यांकडून ई-चलन प्रणालीद्वारे दंड वसूल करण्यात येत आहे.

  • खड्डेमुक्ती प्रकल्प : 2024 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने 8 हजारपेक्षा अधिक रस्ते दुरुस्त केले.

  • अतिवेगावर नियंत्रण : हायवे व शहरी रस्त्यांवर स्पीड गन, कॅमेरे, ई-चलन, दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कारवाई, नियमित अल्कोहोल टेस्ट, हेल्मेट, सीटबेल्ट सक्ती, दंड व जनजागृती मोहिमा.

  • व्यावसायिक चालकांचे प्रशिक्षण : ट्रक, बस चालकांसाठी खास रस्ता सुरक्षा कोर्स.

  • वाहन फिटनेस तपासणी : दरवर्षी वाहनांची तांत्रिक तपासणी.

  • रस्ते व वाहतूक व्यवस्थापन सुधारणा : वारंवार अपघात होणारी ठिकाणे दुरुस्त करणे.

  • स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल : रस्त्यांवर रिफ्लेक्टर, साईनबोर्ड, स्पीड ब्रेकर बसविणे.

  • खड्डेमुक्त रस्ते अभियान : विशेषतः पावसाळ्यात पादचारी पूल, झेब्रा क्रॉसिंग वाढवणे.

  • जनजागृती मोहिमा : दरवर्षी जानेवारीत रस्ता सुरक्षा सप्ताह, शाळा-कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा शिक्षण तसेच सोशल मीडियावर ड्राईव्ह सेफ अभियान राबविणे

  • कायदे व धोरणे : मोटर वाहन (दुरुस्ती) कायदा, 2019 - दंड व शिक्षा कठोर पणे राबविणे

  • आपत्कालीन सेवा, हेल्पलाईन 108 हेल्पलाईनचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती करणे, अपघातग्रस्तांना त्वरित रुग्णालयात नेणे, अपघात झाल्यास हायवे पेट्रोलिंग व्हॅनद्वारे तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येते.

  • गोल्डन अवर उपचार योजना : अपघातानंतरच्या पहिल्या एक तासांत मोफत उपचार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news