Simhastha Kumbh Mela | नाशिकच्या विकासाला 'अर्थ'बळ! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद; जिल्ह्याला नवसंजीवनी

Simhastha Kumbh Mela | नाशिक येथे राज्य जलमाहिती केंद्र; ग्रोथ हब संकल्पनेलाही चालना
Simhastha Kumbh Mela Nashik
Janori Kumbh Mela 2026Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पात सिंहस्थाच्या तयारीसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्याच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Water Problem | नदीजोड प्रकल्प योजनांच्या मंजुरीने पाणीप्रश्न मार्गी

जलव्यवस्थापन, धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास याबाबतही तरतुदी केलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या सन २०२६- २७ च्या राज्य अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

नाशिक येथे राज्य जलमाहिती केंद्र राज्यातील जलसंपत्तीचे प्रभावी नियोजन, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलस्रोतांचे नियमन करण्यासाठी नाशिक येथे राज्य जलमाहिती केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या केंद्रासाठी ७१.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, जलसंपत्तीची डिजिटल व प्रमाणित माहिती उपलब्ध करून देण्यास या केंद्राची मदत होणार आहे.

सिंहस्थाचे नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी भरीव निधी जगप्रसिद्ध नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आणि विकास कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरातील विविध विकासकामांना गती मिळणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात रस्ते, वाहतूक व्यवस्था, नदीघाट विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमु‌ळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Municipal Corporation | विधिमंडळात आमदारांकडून नगरसेवकांवर पलटवार

रामकाल पथ विकास प्रकल्पाला गती: नाशिक शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला अधोरेखित करणाऱ्या रामकाल पथ विकास प्रकल्पाची कामे सुरू असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच शहराच्या पर्यटन क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. नाशिक विमानतळ विस्तारासाठी निधी राज्यातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नाशिक विमानतळाच्या विस्तारासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे उद्योग, पर्यटन आणि गुंतवणूक वाढीसाठी महत्त्वाची मदत होणार आहे. नाशिक ग्रोथ हब म्हणून विकसित होणार बई महानगराच्या धर्तीवर पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे ग्रोथ हब विकसित करण्याची योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि शहरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news