नाशिक: बोरगाव येथे आदिवासी समाजाचा रास्ता रोको

नाशिक: बोरगाव येथे आदिवासी समाजाचा रास्ता रोको

सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ देऊ नये, यासाठी आदिवासी टायगर ग्रुप, अखिल भारतीय विकास परिषद आणि आसरा फाउंडेशनतर्फे आज (दि. १) सकाळी ११ वाजता एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सुरगाणा तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. रास्ता रोकोची दखल शासनाने घेतली नाही, तर आदिवासी आसरा फाउंडेशनतर्फे चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

आदिवासी समाजाला संविधानाने साडेसात टक्के आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाचा लाभ घेऊन आदिवासी समाजाला विविध योजना व शासकीय नोकरीचा लाभ मिळत आहे. धनगर समाजाला आदिवासी आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी योजनांचा लाभ देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ सप्टेंबरला केली. याचा विरोध म्हणून आदिवासी संघटनांनी बोरगावच्या बिरसा मुंडा चौकात रास्ता रोको केला. तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले की, रास्ता रोकोची दखल शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येईल या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी मोहन गांगुर्डे, सखाराम भोये, अशोक गवळी, भास्कर भोये, संदीप भोये, मुरलीधर ठाकरे, चंद्रकांत भरसट, सचिन राऊत, पंकज चव्हाण, हेमंत खंबाईत, जीवन मोहन, नवनाथ पवार, दिनेश गांगुर्डे, चंद्रकांत गावित, हरेष पवार, किरण पवार, प्रकाश पवार, मनोज चौधरी, मनोहर पवार, मुरलीधर राऊत, सुंदर जोपळे, जानु गांगुर्डे, काशीनाथ भोये, शांताराम गांगोडे, किरण बागुल, दीपक बोरसे, दीपक गांगुर्डे, शांताराम गवळी, पुंडलिक धुळे, सतिश गाढवे, आनंद पडवळ, दीपक गांगुर्डे, कल्पना भरसट, चंद्रकला गावित, शोभा जोपळे तसेच सुरगाणा तालुक्यातील आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news