Nashik | क्षयरोगमुक्तीसाठी बीसीजी लसीकरणाला आला वेग; आत्तापर्यंत 16 हजार लाभार्थी

आतापर्यंत १६ हजार लाभार्थ्यांनी घेतली लस
BCG Vaccination In Wardha District
बीसीजी लसीकरण Pudhari Photo
Published on
Updated on

नाशिक : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग मुक्तीसाठी महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या प्रौढांसाठीच्या बीसीजी लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून, गेल्या २० दिवसांत नाशिक शहरातील तब्बल १६ हजार १० लाभार्थींना लस देण्यात आली आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत ही मोहीम चालणार असून, शहरातील अडीच लाखांहून अधिक प्रौढ व्यक्तींना ही लस दिली जाणार आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत आपला देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना सुरू आहेत. यात क्षयरुग्णांचे निदान, उपचार, पाठपुरावा करणे, निक्षय पोषण आहारासाठी दरमहा ५०० रुपये क्षयरुग्णांना दिले जात आहे. याबरोबरच आता क्षयरोग प्रतिबंध करण्यासाठी लहान मुलांना दिली जाणारी बीसीजी लस प्रौढ व्यक्तींनादेखील देण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. सातपूर विभागातील मायको दवाखाना येथे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना लस टोचणी करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. लस बंधनकारक नसली तरी क्षयरोगमुक्तीसाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी संमती दिलेल्या व शासनाच्या 'टीबी-वीन'पोर्टलवर नोंदणी झालेल्या व नोंदणी न झालेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. महापालिकेची सर्व रुग्णालये, शहरी आरोग्य सेवा केंद्रांवर बीसीजी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर या लसीकरणासाठी महापालिकेच्या क्षयरोग निर्मूलन विभागाने मोबाइल टीम तयार केल्या असून, मागणीनुसार पालिकेचे पथक प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन शिबिराच्या माध्यमातून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करत आहेत. गेल्या २० दिवसांत १६ हजार १० नागरिकांनी लस घेतली आहे, अशी माहिती शहर क्षयरोग निर्मूलन अधिकारी शिल्पा काळे यांनी दिली.

BCG Vaccination In Wardha District
Nashik | राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन : शहरात आजपासून प्रौढांना बीसीजी लस

सुरुवातीला अल्प प्रतिसाद

गणेशोत्सवाच्या लगबगीमुळे सुरुवातीला या बीसीजी लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाला. या लसीकरणाविषयी काही गैरसमजुतीही होत्या. लसीकरण सक्तीचे नसल्याने लोकांचा लसीकरणाकडे कल कमी होता. मात्र, पालिकेच्या पथकाने या मोहिमेसाठी जनजागृती सुरू करून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन लसीकरण सुरू केल्याने आता या मोहिमेने वेग घेतला आहे.

क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाच्या निर्देशांनुसार नाशिक महापालिकेच्या माध्यमातून प्रौढांसाठी बीसीजी लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. महापालिकेने या लसीकरण मोहिमेविषयी जनजागृती सुरू केली असून, लसीकरणाचा वेग वाढू लागला आहे.

शिल्पा काळे, शहर क्षयरोग अधिकारी, महापालिका, नाशिक.

BCG Vaccination In Wardha District
क्षयरोग मुक्तीसाठी बीसीजी लस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news