नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

file photo
file photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मैत्रिणीला फिरावयास नेऊन तिला मद्य पाजून व लग्नाचे आमिष दाखवून एकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित नीलेश दळवी (रा. ध्रुवनगर) याने जुलै २०२२ मध्ये घोटी येथील हॉटेल विवांत रिसोर्ट येथे नेत पीडितेला बळजबरीने दारू पाजली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत येथील कोर्टयार्ड हॉटेलमध्ये नेत अत्याचार केला. तसेच पीडितेसह तिच्या नातलगांना शिवीगाळ, धमकी दिली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news