‘क्लायमेट चेंज’मुळे जीवसृष्टीच ‘आयसीयू’त : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंची खंत | पुढारी

‘क्लायमेट चेंज’मुळे जीवसृष्टीच ‘आयसीयू’त : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंची खंत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वातावरण बदलामुळे अवघी जीवसृष्टीच धोक्यात आली असून, ती आयसीयू (अतिदक्षता विभाग) मध्ये आहे असेच वाटत आहे. त्यामुळे त्यावर हरित तंत्रज्ञान हाच प्रभावी पर्याय आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. गोखले इंस्टिट्यूटच्या वतीने आयोजित प्रा. पी. आर. दुभाषी यांच्या स्मृतीनिमित्ताने व्याख्यानात गुरुवारी सुरेश प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरु डॉ. अजित रानडे यांची उपस्थिती होती. प्रभू म्हणाले, सर्व जग क्लायमेट चेंजमुळे प्रभावित झाले आहे. जगाचे तापमान आणखी 1.5 ते 2 अंशांने वाढण्याच्या दिशेने जात आहे. तसेच झाले तर अवघी जीवसृष्टीच धोक्यात येईल. त्यावर हरित इंधन हाच पर्याय आहे.त्याचा वापर भारताने करायला हवा.

मोदींसह गुजरातचे कौतुक

प्रभू यांनी व्याख्यानात दोन वेळा पंतप्रधान मोदी व गुजरात राज्याचे कौतुक केले. मोदी यांनी कार्बन न्युट्रलचा करार जागतिक हवामान परिषदेत केला आहे. त्यामुळे भारताने ही चांगली सुरुवात केली आहे. क्लायमेट चेंज विभाग सुरू करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य आहे.

गव्हाचे उत्पादन धोक्यात

आज तापमान वाढीने कहर केला आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन धोक्यात येत आहे. महाराष्ट्रातील 1972च्या दुष्काळापेक्षाही सध्याची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे हरित तंत्रज्ञान हाच आपल्याला आशेचा किरण आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button