Aviation News Nashik | नाशिक विमानसेवेच्या पंखांना प्रवाशांचे बळ

शुभवार्ता : एका दिवसात विक्रमी १२२८ प्रवाशांचे उड्डाण
Nashik Airlines
Nashik Airlinespudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : दोन वर्षांपूर्वी अडगळीत सापडलेली नाशिकची विमानसेवा आता नाशिककर प्रवाशांच्या बळावर मोठी भरारी घेताना दिसून येत आहे. यापूर्वी नाशिकच्या विमानसेवेचा एका दिवसातील ९७० प्रवाशांनी केल्याला प्रवासाचा विक्रम शुक्रवारी (दि. १३) मोडीत निघाला असून, १२२८ प्रवाशांनी एकाच दिवसात नाशिकच्या विमानसेवेतून प्रवास केल्याने नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. (A new record has been registered as 1228 passengers traveled by Nashik air service in a single day)

नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे करीत एकाच दिवसात तीन एअरलाइन कंपन्यांनी आपल्या सेवा बंद करीत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे नाशिकची विमानसेवा पूर्णत: अडचणीत सापडली होती. अशात इंडिगो कंपनीने नाशिकहून विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. सुरुवातीला मोजक्याच शहरासाठी सेवा सुरू करणाऱ्या इंडिगोची सद्यस्थितीत तब्बल सात शहरांसाठी सेवा सुरू आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा, इंदूर या शहरासह गेल्या १० सप्टेंबरपासून कंपनीने नाशिक-बेंगळुरू सेवा सुरू केली आहे. या सर्वच सेवांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, इतरही शहरांमध्ये सेवा सुरू करण्यास कंपनी विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.१३) विक्रमी प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतल्याने, इंडिगो कंपनीसह शहरातील व्यापार, उद्योग क्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. यापूर्वी ९७० प्रवाशांनी एकाच दिवशी प्रवास केल्याच्या विक्रमाची नोंद होती. मात्र, आता हा विक्रम मोडीत निघाला असून, १२२८ प्रवाशांचा एकाच दिवसातील प्रवासाचा नवा विक्रम स्थापित झाला आहे.

सहा फ्लाइटमधून प्रवास

नवी दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, नागपूर आणि गोवा या फ्लाइटमधून विक्रमी संख्येने प्रवाशांची प्रवास केल्याची नोंद झाली आहे. या शहरांमधून नाशिककडे तब्बल ६१० प्रवाशांनी प्रवास केला. तर नाशिकहून ६१८ प्रवाशांनी उड्डाण घेतले आहे.

Nashik Airlines
Nashik News | 'सुखोई' पंखांना स्वदेशी एरो-इंजिनचे बळ

बेंगळुरूसाठी २३२ आसनी विमान

गेल्या १० सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या नाशिक-बेंगळुरू विमानसेवेसाठी प्रारंभी १८० आसनी फ्लाइट इंडिगो कंपनीकडून उपलब्ध करून दिली जाणार होती. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद बघता कंपनीने २३२ आसनी फ्लाइट उपलब्ध करून दिली आहे. पुढील दोन महिने २३२ आसनी फ्लाइट देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

दोन लाख प्रवाशांची भरारी

नाशिकच्या विमानसेवेची कमान इंडिगो कंपनीने हाती घेतल्यानंतर, नाशिकच्या विमानसेवेचा ग्राफ उंचावताना दिसून येत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे दोन लाख २५ हजार प्रवाशांनी इंडिगोच्या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला बळ मिळताना दिसून येत आहे.

नाशिकच्या विमान सेवेबाबत हा विक्रम नक्कीच सकारात्मक असून, व्यापार-उद्योग क्षेत्रासाठी आनंदवार्ता घेऊन येणारा म्हणावा लागेल. पुढील काही दिवसांत हादेखील विक्रम मोडीत निघण्याची अपेक्षा असून, नाशिक देशातील इतरही शहरांना जोडले जाईल, असा विश्वास आहे.

मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, निमा, नाशिक.

Nashik Airlines
'सुखोई'च्या पंखांना 'एचएएल' देणार बळ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news