Nashik News | 'सुखोई' पंखांना स्वदेशी एरो-इंजिनचे बळ

२६ हजार कोटींच्या निधीला सुरक्षाविषयक मंत्रिमंडळाची मंजुरी
'HAL' will give strength to the wings of 'Sukhoi'
'सुखोई'च्या पंखांना 'एचएएल' देणार बळfile photo
Published on
Updated on

नाशिक : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या नाशिक विभागाने सुखोई- ३० एमकेआय विमानांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली आहे. आता या सुखोईला स्वदेशी '२४० एरो- इंजिन'चे बळ मिळणार असून, त्यासाठी लागणाऱ्या २६ हजार कोटींच्या निधीला सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. या एरो इंजिनचा पुरवठा एक वर्षानंतर सुरू होणार असून, आठ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणार आहे. (Hindustan Aeronautics Limited i.e. HAL's Nashik division has taken over the maintenance and repair of Sukhoi-30 MKI aircraft)

एरो-इंजिनच्या काही प्रमुख घटकांच्या स्वदेशीकरणामुळे इंजिनांमध्ये ५४ टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असेल. एचएएलच्या कोरापूट विभागात या एरो-इंजिनचे उत्पादन केले जाणार आहे. एसयू- ३० एमकेआय हे भारतीय वायू दलाचे सर्वात शक्तिशाली विमान आहे. भारतीय हवाई दल नवीन इंजिनांचा वापर करून आपली लढाऊ विमाने अपग्रेड करणार आहे. यासह सुखोई-३० एमकेआय विमान पुढील ३० वर्षांच्या गरजेनुसार अपग्रेड केले जातील. या संपूर्ण अपग्रेडसाठी ६३ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यात ८४ सुखोई विमाने अद्ययावत करण्यात येणार आहेत. या लढाऊ विमानांची मारक क्षमता अचूक बनवण्यासाठी एआय आणि डेटा सायन्सचाही वापर केला जाईल.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात मॉस्को येथे झाली होती बैठक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या रशिया दौऱ्यादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेतच्या बैठकीत भारत व रशिया मिळून 'सुखोई-३० एमकेआय' लढाऊ विमानांची निर्मिती करू शकतात, अशी माहिती रशियातील वृत्तसंस्थेने दिली होती. यानुसार नाशिकमधील ओझरच्या 'एचएएल कारखान्यात या विमानांचे उत्पादन होण्याची शक्यता संरक्षण क्षेत्रातील अभ्यासकांकडून वर्तवली गेली होती.

'HAL' will give strength to the wings of 'Sukhoi'
'सुखोई'च्या पंखांना 'एचएएल' देणार बळ

नाशिकमध्ये पूर्वीपासूनच देखभाल-दुरुस्ती

जगाच्या पाठीवर अनेक देश सुखोई- ३० एमकेआयसारख्या उच्च क्षमतेच्या विमानांचा त्यांच्या हवाई दलात समावेश करण्यासाठी उत्सुक असल्याने संरक्षणाच्या क्षेत्रात हे पाऊल महत्त्वाचे मानले जाते आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल)च्या नाशिक विभागाने सुखोई- ३० एमकेआय या लढाऊ विमानांची देखभाल व दुरुस्ती करण्यात आपल्या कौशल्याचा प्रत्यय यापूर्वीच दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news