Nashik Accident | चालकाचे नियंत्रण सुटल्याने येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस उलटली; अपघातात एकाचा जागीच मृत्यू

Nashik Accident |येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी महामार्गावर सोमठाणे जोश घाटामध्ये लक्झरी बसचा अपघात झाला, अनेक प्रवासी जखमी
nashik accident
येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी महामार्गावर सोमठाणे जोश घाटामध्ये लक्झरी बसचा अपघात झालाpudhari photo
Published on
Updated on

येवला : येवला-नांदगाव रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास लक्झरी बस उलटली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस रस्त्यावर उलटली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.

अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आले आहेत.

nashik accident
Solapur Bribery Case : लाचखोर मंडल अधिकारी जाळ्यात

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त लक्झरी बस ही मध्य प्रदेशातील होती. पहाटेच्या सुमारास सोमठाणे घाटामध्ये येवला-नांदगाव रस्त्यावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही खासगी लक्झरी बस पलटी झाली अन् थेट रस्त्यावरच आडवी झाली. बसमध्ये अंदाजे २० ते २५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मदतकार्य करून प्रवाशांना बस मधून बाहेर काढले. लक्झरी बस रस्त्याच्या मधोमध आडवी झाल्यामुळे येवला-नांदगाव महामार्गावर वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद झाली होती.

nashik accident
Solapur Bike theft|आंतरजिल्हा मोटारसायकल चोर जेरबंद; सखोल चौकशीत कबुली, १४ दुचाकींसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिस प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक पर्याय रस्त्याने सुरू करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news