नाशिक : अजमेर सौंदाणे येथील घटनेबाबत अखेर गुन्हा दाखल; संशयित शिक्षकाला अटक

नाशिक : अजमेर सौंदाणे येथील घटनेबाबत अखेर गुन्हा दाखल; संशयित शिक्षकाला अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील अजमेर सौंदाणे येथील निवासी आदिवासी एकलव्य विद्यालयातील शिक्षक व वसतिगृह अधीक्षकांच्या गैरप्रकाराची घटना दि.१५ जानेवारी २०२४ रोजी समोर आली होती. या गंभीर प्रकरणाची दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतल्यानंतर कारवाईला गती मिळाली. पोलिसांनी तत्काळ आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करत केलेल्या कारवाईचा अहवाल डॉ. गोऱ्हे यांना सादर केला आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आदिवासी विकास विभाग आयुक्त नयना गुंडे व पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांना संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दि. १९ जानेवारी २०२४ रोजी दिले होते. तसेच या घटनेसंदर्भात नाशिक विभागीय कार्यालय येथे दि. ५ फेब्रुवारीला बैठक घेत गुन्हा दाखल करण्यास झालेल्या दिरंगाईबाबत विचारणा केली होती. त्यानंतर जलदगतीने कार्यवाही झाली. विशाखा समितीमुळे ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत महिन्यातून एकदा समितीची बैठक आयोजित करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

मुख्याध्यापकांच्या फिर्यादीनुसार संबंधित शिक्षकाविरोधात गुन्ह्याची नोंद करत अटक केली आहे. गुरुवारी (दि. ८) न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. – बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, सटाणा.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news