नाशिक : महिला व्यावसायिकासह तरुणाला 45 लाखांचा गंडा

नाशिक : महिला व्यावसायिकासह तरुणाला 45 लाखांचा गंडा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भामट्यांनी महिला व्यावसायिकासह तरुणाला आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. दोघांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी त्यांना सुमारे ४५ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सरकारवाडा व सायबर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पहिल्या घटनेत नाशिक शहरातील महिलेच्या फार्मा इंडस्ट्रीत लॅब साहित्य पुरविण्यासाठी कर्ज मंजुरीनंतर ३९ लाख रुपये घेत त्या बदल्यात फक्त दोन लाखांचे साहित्य दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी सायली सुनील चिडे (रा. टागोरनगर) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित राजेंद्रदुर्गा प्रसाद मोदी व अनिता राजेंद्रदुर्गा मोदी यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. जानेवारी २०२० ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संशयितांनी सायली यांना गंडा घातला. नोकरी सोडल्यानंतर सायली यांनी नातलगांच्या मदतीने फार्मा इंडस्ट्री सुरू केली होती. त्यांनी ऑनलाइन स्वरूपात लॅब साम्रगी खरेदीसाठी शोध घेतला, तेव्हा संशयित राजेंद्र मोदी यांच्याशी ओळख झाली. सामग्रीची रक्कम ३९ लाख ३२ हजार रुपये असल्याने फिर्यादींनी कर्ज घेतले हाेते. कर्ज मंजुरीनंतर ३९ लाख ३२ हजार रुपये मोदींच्या बँक खात्यात जमा केले होते.

त्यानंतर संशयिताने २ लाख ६२ हजारांची सामग्री दिली. मात्र उर्वरित साहित्य सायली यांना न देता साहित्य किंवा पैसे देण्यास टाळाटाळ केली. वारंवार पाठपुरावा करूनही 'तुमचे पैसे आणि सामानही मिळणार नाही. जे करायचे ते करा', असे मोदी यांनी सायली यांना सांगितले. त्यामुळे सायली यांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहेत.

लॉटरीचे आमिष दाखवून गंडा

50 करोड रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून भामट्याने नाशिकच्या एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. राहुल मुरलीधर मंडलिक (३२, रा. सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने १३ फेब्रुवारी ते १३ मे दरम्यान, लॉटरीचे आमिष दाखवून वेगवेगळ्या स्वरूपांतील करवसुलीच्या नावे ७ लाख ७ हजार ५९४ रुपये घेतले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. संशयिताने टेलिग्रामवरून गंडा घातला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news