Nashik Fake Shalarth ID Scam | बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा 'सही' खेळ

Nashik Fake Shalarth ID Scam | बदली-निवृत्तीनंतरही अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्याचे निष्पन्न
Shalarth ID
Shalarth IDPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : निखिल रोकडे

१६० कोटींच्या व १००० पेक्षा अधिक बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिक्षण विभागातील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदली व सेवानिवृत्ती झाल्यानंतरही बनावट शालार्थ आयडी बनविताना स्वाक्षऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आणखीही काही शिक्षण विभागातील अधिकारी पोलिस यंत्रणेच्या रडारवर आले आहेत.

Shalarth ID
Nashik Pune Semi High Speed Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेरात जागरण गोंधळ; काकोडकर समितीची मुदत संपली

बदली आणि निवृत्तीनंतरही या प्रकरणातील प्रशासकीय निर्णयांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग कसा राहिला, याचा तपास एसआयटीकडून करण्यात येत आहे. शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी धक्कादायक माहिती विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती येत आहे.

अटक केलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान होणाऱ्या खुलाशामुळे या घोटाळ्याचे धागेदोरे राज्यभर पसरल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आतापर्यंत एक हजारांहून अधिक बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात जळगाव येथील शिक्षण संचालक संजय गरुड आणि दीपक गरुड हे कारागृहात असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच शरद शिंदे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिक संवेदनशील बनला आहे. दुसरीकडे भाऊसाहेब चव्हाण आणि नितीन बच्छाव यांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले असले, तरी तपास यंत्रणेच्या कारवाईपासून त्यांच्यापुढील धोका अद्याप संपलेला नसल्याचे चित्र आहे.

न्यायालयीन संरक्षणाच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्यासमोर अटकेची टांगती तलवार कायम असल्याची चर्चा आहे. या घोटाळ्यात बनावट शालार्थ आयडी तयार करून पात्र नसलेल्या व्यक्तींना वेतनप्रणालीत समाविष्ट करणे, कागदपत्रांमध्ये फेरफार करणे आणि शासनाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार टाकल्याचा आरोप तपासात समोर येत आहे. आरोपींच्या चौकशीतून आर्थिक व्यवहारांची साखळी, बनावट कागदपत्रांची निर्मिती आणि त्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींची माहिती उघड होत आहे.

Shalarth ID
Saptashrungi Gad | नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी सप्तशृंगगड सज्ज होणार! वाहतूक, पाणी अन् आरोग्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश

दरम्यान, विशेष तपास पथकाकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्या अटकेनंतर घोटाळ्यातील आर्थिक व्यवहार आणि बनावट शालार्थ आयडी तयार करण्यामागील संपूर्ण यंत्रणा उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षण विभागातील आणखी काही अधिकारी तपासाच्या रडारवर येण्याची शक्यता असून, या प्रकरणात नेमके आणखी कोणते चेहरे समोर येतात, याकडे राज्याचे लक्ष लागले.


नितीन उपासनी अकरा महिन्यांपासून कारागृहात:

या प्रकरणातील शिक्षण अधिकारी तसेच एसएससी बोर्डाचे माजी अध्यक्ष नितीन उपासनी गेल्या अकरा महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात असून, प्रत्येक महिन्याला नवी तारीख मिळत आहे. त्यामुळे उपासनी यांच्या जामिनाच्या निर्णयाकडेही लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news