Natsamrat Gopal Govind Phatak: 'नटसम्राट'ची प्रेरणा देणारा 'नटसम्राट', कुसुमाग्रजांच्या मनातील 'गणपतराव' कोण होते?

Natsamrat Natak Inspiration | कुसुमाग्रजांच्या मनातील 'गणपतराव' म्हणजे नानासाहेब फाटक
Natsamrat Play True Inspiration
Natsamrat Play True Inspiration
Published on
Updated on

Natsamrat Gopal Govind Phatak

नाशिक : अंजली राऊत

'नटसम्राट' हे नाटक तात्यासाहेबांनी शेक्सपियरच्या नाटकांतून प्रेरणा घेत लिहिल्याचे मानले जाते. मात्र, मूळ प्रेरणा 'नटसम्राट' नानासाहेब फाटक यांची आहे. त्यांच्या आग्रहाखातरच, त्यांना डोळ्यासमोर ठेवून तात्यासाहेब अर्थात ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांनी 'नटसम्राट' नाटकाचे लेखन केल्याचे समोर आले असून, 'नटसम्राट'चे खरे प्रेरणास्रोत गोपाळ गोविंद फाटक ऊर्फ नानासाहेब फाटक होते, आज त्यांची जयंती आहे.

Natsamrat Play True Inspiration
Vaibhav Suryavanshi | भारतीय क्रिकेटचे नक्षत्र‘वैभव’

नानासाहेब फाटक हे मराठी रंगभूमीवरील युगपुरुष आणि अत्यंत प्रतिभावान नट होऊन गेले. दि. २४ जून १८९९ रोजी कोल्हापूर येथे जन्मलेल्या नानासाहेबांनी ३५ वर्षे मराठी नाट्यसृष्टीवर अधिराज्य गाजवले त्यामुळेच ते 'नटसम्राट' म्हणून ओळखले जाऊ लागले. नाट्य अभिनयातील सम्राटपदाचे अधिकारी निर्विवाद नानासाहेब फाटक हेच आहेत.

बालगंधर्वांनंतर मराठी रंगभूमीवर गौरीशंकरासारखे आकाश व्यापून कोणी उभं राहिलं असेल, तर ते नानासाहेब फाटक...' हे तात्यासाहेबांचे शब्द आहेत. तात्यासाहेब हे विल्यम शेक्सपियरच्या साहित्याचे निस्सीम चाहते होते. त्याचा प्रभाव त्यांच्या लेखनावरही दिसून येतो. तात्यासाहेबांच्या मनात नानासाहेबांविषयी आदरयुक्त भावना असल्यामुळेच त्यांच्या आग्रहासाठी शेक्सपियरच्या 'किंग लियर'चे रूपांतर करण्याचे ठरविले.

मुंबई साहित्य संघाच्या कट्टयावर नानासाहेब यांनीच तात्यासाहेबांना सुचविले होते की, त्यांच्यासारख्या वयोवृद्धासाठी तात्यासाहेबांनी काही तरी लिहायला हवे. त्यानुसार नानासाहेबांना डोळ्यासमोर ठेवत 'किंग लियर'च्या रूपांतरावर विचार रेंगाळत असतानाच तात्यासाहेबांच्या मनात वेगळाच विचा आला.

नानासाहेबांसारखाच रंगभूमीवरच राजा घेऊन नवीन काही तरी का लिहू नये? असा विचार मनात आला. त्यानंत तात्यासाहेब म्हणतात की, नानासाहेबांसारख महान नट माझ्या मनात उभा राहून किंग् लियरसारखे नायकत्व आग्रहाने स्वतःसाठ मागतोय. लिखाणाअंती समोर आले 'नटसम्राट' आणि नाटकातील नायक 'गणपतराव' अर्थात आप्पा बेलवलकर

Natsamrat Play True Inspiration
Automobile Industry | विद्युतीकरणाचा वेग वाढवायचा तर...

नानासाहेबांच्या कारकिर्दीची वैशिष्ट्ये

नानासाहेबांनी अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्या. त्यांनी पौराणिक, सामाजिक, ऐतिहासिक ते अगदी शेक्सपियरच्या नाटकांपर्यंतच्या भूमिका ताकदीने केल्या आहेत. शेक्सपियरच्या 'हॅम्लेट' मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. ज्या नानासाहेबांना डोळ्यांसमोर ठेवून तात्यासाहेबांनी नाटक लिहिले, त्यात मात्र नानासाहेब भूमिका साकारू शकले नसल्यामुळे डॉ. श्रीराम लागू यांनी गणपतरावांची भूमिका जिवंत केली.

नानासाहेब फाटकांचे धिप्पाड, रूबाबदार व्यक्तिमत्त्व, तीक्ष्ण नजर आणि व्यक्तिमत्त्वातला देखणेपणा, स्वभावातला ताठरपणा, झटकन उसळणारा संताप, अभिमान आणि अहंकार... हे सारे आप्पासाहेब बेलवलकरांना नानासाहेब फाटकांनी दिले आहे. स्वगत हे नाटकाचा आत्मा असून, त्यांनी यात प्रभावशाली सादर केले आहे. 'नटसम्राट' हे नाटक नानासाहेबांच्या इच्छेमुळे समोर आले असल्याचा संदर्भ गो. तु. पाटील यांनी लिहिलेल्या 'नटसम्राट समीक्षा' या पुस्तकातही आहे.

- डॉ. दिलीप धोंडगे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान

तात्यासाहेब यांच्या लिखाणावर राम गणेश गडकरी यांच्या विचारांचाही प्रभाव स्वगतामधून दिसून येतो. यामधून वृद्धापेक्षा कलावंताची शोकांतिका स्पष्ट दिसून येते. १९७१ मध्ये लिहिलेल्या नाटकामधील दोन पिढीचा संघर्ष आमाच्या एआयच्या युगामध्येही दिसून येतो.

-अॅड. राजेंद्र डोखळे, सहकार्यवाह, कुसुमाग्रज प्रतिष्ठान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news