Namco Hospital Nashik |"अवघ्या 625 ग्रॅम वजनाच्या चिमुरड्याला मिळालं नवजीवन! नामको हॉस्पिटलची वैद्यकीय क्षेत्रातील सुवर्ण कामगिरी"

Namco Hospital Nashik | विशेष म्हणजे या बाळावरील संपूर्ण उपचार शासनाच्या आरोग्य योजनेतंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आले.
Namco Hospital Nashik
Namco Hospital Nashik
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नामको हॉस्पिटलच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाने अत्यंत आव्हानात्मक वैद्यकीय उपचार यशस्वीरीत्या पूर्ण करीत, केवळ ६२५ ग्रॅम वजनाच्या अतिजोखमीच्या नवजात बाळाला नवजीवन दिले. विशेष म्हणजे या बाळावरील संपूर्ण उपचार शासनाच्या आरोग्य योजनेतंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आले.

Namco Hospital Nashik
Sambhajinagar News : कमी वजनाच्या नवजात शिशूला घाटीत जीवनदान

हे बाळ घरीच अकाली जन्मले होते. अत्यंत कमी वजन आणि गंभीर प्रकृतीमुळे अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये उपचारास नकार मिळाल्यानंतर आदिवासी कुटुंबातील पालकांनी शेवटची आशा म्हणून नामको हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती.

येथे डॉ. निखिल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील अनुभवी वैद्यकीय टीमने बाळावर तत्काळ उपचार सुरू केले. सुमारे दोन महिन्यांच्या सातत्यपूर्ण आणि अतिदक्ष उपचारांनंतर बाळाची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली.

उपचाराच्या सुरुवातीला ६२५ ग्रॅम असलेले बाळ डिस्चार्जच्या वेळी १,३१० ग्रॅम वजनापर्यंत पोहोचले होते. बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर शनिवारी (दि. ११) त्याला आनंदाने घरी सोडण्यात आले.

याविषयी माहिती देताना डॉ. निखिल कुलकर्णी यांनी सांगितले की, अतिशय कमी वजनाच्या नवजात बाळांवर उपचार करणे हे अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जबाबदारीचे काम असते. नामको हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाचे व्हेंटिलेटर्स, आधुनिक इन्क्युबेटर्स, फोटोथेरपी यंत्रणा आणि अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असल्यामुळे अशा गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये यश मिळू शकते.

Namco Hospital Nashik
Sambhajinagar News : अबब! महिलेच्या पोटातून २२ आठवड्यांच्या गर्भाशयाच्या आकाराची गाठ काढली

या बाळावरील सर्व उपचार शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत मोफत झाल्यामुळे पालकांनी नामको हॉस्पिटल, डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय टीमबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन सोहनलाल भंडारी आणि सचिव शशिकांत पारख यांनी डॉ. निखिल कुलकर्णी व संपूर्ण नवजात शिशुकक्ष टीमचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news