Nashik News : दोन ग्रामपंचायत कर्मचारी नायलॉन मांजाने जखमी

गुरेवारी फाटा येथील घटना; सिन्नरमधील कारवाईनंतरही वापर
Nylon string injuries
सिन्नर नायलॉन मांजामुळे जखमी झालेले मुसळगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी.pudhari photo
Published on
Updated on

दातली : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील दोघे ग्रामपंचायत कर्मचारी करवसुलीचे काम करत असताना नायलॉन मांजाने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. विकी पोपट जाधव व शिवशंकर खामकर अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे असून, दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गुरेवाडी फाटा शिवारात ग्रामपंचायतीचे करवसुलीचे काम सुरू असताना लोंबकळत असलेल्या नायलॉन मांजाने कर्मचाऱ्यांच्य भुवईजवळ व हाताला खोल जखमा केल्या. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. पाहणाऱ्यांनी तातडीने मदत करून जखमींना उपचारांसाठी हलवले.

Nylon string injuries
Tapovan Nashik tree cutting : तपोवनातील वृक्षतोडीचा वाद चिघळला

यापूर्वी सिन्नर शहरात दोन-तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या घटनेनंतर सिन्नर पोलिस व नगर परिषद प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत सुमारे दहा लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला होता. जप्ती मोहिमेमुळे काही काळ मांजाच्या वापरात अंशतः घट झाली असली तरी, पुन्हा अशा घटना घडू लागल्याने प्रशासनाची कारवाई पुरेशी ठरत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

संबंधितांवर कडक कारवाईची मागणी

स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत नायलॉन मांजा विक्री व वापरावर पूर्ण बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तर सुरक्षा दृष्टीने संबंधित विभागांनी अधिक कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.

Nylon string injuries
School closure strike : 5 डिसेंबरला शाळा बंद ठेवल्यास एक दिवसाचे वेतन कापणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news