Nashik High-Tech Election Campaign : एलईडी व्हॅनद्वारे हायटेक प्रचाराला वेग

प्रचार रॅलीपेक्षाही प्रभावी; मात्र उमेदवारांना वाहने मिळेना झाले मुश्कील
Nashik High-Tech Election Campaign
एलईडी व्हॅनद्वारे हायटेक प्रचाराला वेगpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अवघे आठ दिवस मतदानाला शिल्लक राहिल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी कंबर कसली आहे. कमी वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत उमेदवाराचे नाव व चिन्हे पोहोचविण्यासाठी प्रचारफेरी सोबतच आता एलईडी व्हॅनच्या माध्यमातून हायटेक प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सध्या चौकाचौकांत सध्या एलईडीजऊइारे हायटेक प्रचार करणारे वाहने दिसत आहेत.

निवडणूक म्हटली म्हणजे प्रचार आलाच. पूर्वपरंपरागत पद्धतीनुसार घरोघरी भेटी देऊन हात जोडत मतदान करण्याची विनंती करत प्रचार केला जातो. त्याही पुढे जाऊन आता पत्रक (प्रॉस्पेक्ट ) तयार करून त्याद्वारे घरोघरी केलेली कामे आणि करावयाच्या कामांचा जाहीरनाम्यासह उमेदवाराचे छायाचित्र व पक्षाचे चिन्ह छापून वाटप केले जातात. तर कॉर्नर सभा, जाहीर सभा हा शेवटचा टप्पा ठरलेला असतो.

Nashik High-Tech Election Campaign
Nashik Municipal Election : माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुपटी-तिपटीने वाढ

मात्र हल्ली निवडणुकीसाठीही कालमर्यादा कमी झाली आहे. वेळ कमी आणि प्रभाग परिसर मोठा, त्यात मतदार संख्या वाढल्याने निवडणुकांत चुरस वाढली आहे. परिणामी उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात सर्वसामान्य उमेदवारांपुढे तर खर्चाबाबतही तजबिज नसल्याने जेवढे होईल तेवढे घरभेटीद्वारे प्रचार करीत आहेत.

राजकारणात मुरलेले, राजकीय परंपरा असलेले आणि आर्थिक स्थिती चांगली असलेले उमेदवार मात्र हायटेक प्रचाराकडे वळले आहेत. त्यांचाकडून सध्या वाहनांवर मोठी एलईडी स्क्रीन लावून त्यातील चित्रफितीद्वारे उमेदवाराचे व पक्षाचे कार्य आणि चिन्ह मतदारांमध्ये बिंबवले जात आहे. त्यासाठी चौकाचौकांत एलईडी प्रचार वाहने तासन्‌‍तास थांबवून प्रचार केला जात आहे. या हायटेक प्रचाराचा खर्च मोठा आहे.

एका एलईडीची किंमत, वाहन भाडे , चालक आणि चित्रफीत निर्मिती खर्च याचे गणित मोठे आहे. तरीही या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने काही व्यावसायिकांनी याच धंदा बनवला आहे, ते ही यंत्रणा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देत आहेत. त्यात काही उमेदवार प्रतिदिन दराने तर काही जणांनी पूर्ण निवडणुकीचा प्रचाराचा ठेका ठरावीक रक्कम देऊन निश्चित केला आहे.

Nashik High-Tech Election Campaign
Bank Deposit Growth Target : जिल्हा बँकेच्या ठेवी वाढण्यासाठी ‌‘पुढाकार योजना‌’

नाशिकच नव्हे तर पुणे परिसरातूनही ही प्रचार वाहने मागविण्यात आले आहेत. एकाच वेळेस सर्वत्र महापालिका निवडणुका असल्याने एलईडी प्रचार वाहनांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या वाहनधारकांचेही डिमांड वाढले आहे. त्यामुळे दरही तेजीत आहेत. साधारण प्रतिदिन 50 हजार ते एक लाख भाडे आकारले जात आहे. त्यात एका दिवसात किती परिसरात प्रचार केला जाईल, त्यावर हे दर निश्चित केले गेले आहेत. निवडणुकीतएलईडी प्रचाराची क्रेझ मात्र भाव खाऊन जात असल्याचे राजकीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news