Nashik Road | सिंहस्थात मुंबई व त्र्यंबक नाका मार्गाचा कायापालट होणार

Nashik Road | शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मुंबई नाका-गडकरी चौक-त्र्यंबक नाका हा मार्ग आता आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज 'विकास मार्ग' म्हणून विकसित होत आहे.
Dhule News
धुळे तालुक्यातील रस्त्यांचा होणार कायापालटfile photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मुंबई नाका-गडकरी चौक-त्र्यंबक नाका हा मार्ग आता आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज 'विकास मार्ग' म्हणून विकसित होत आहे. नाशिक महापालिकेच्या पश्चिम विभागामार्फत या मार्गावरील काँक्रीट रस्ता, भुयारी सुविधा आणि पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेची कामे युद्धपातळीवर सुरू असून, सिंहस्थ २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहर सज्ञ्जतेला विशेष प्राधान्य दिले जात आहे.

Dhule News
Nashik ITI Signal Road | नाशिक-त्र्यंबकेश्वर 'कनेक्टिव्हिटी'ला बळ

सुमारे १.१४० किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाच्या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून, त्यासोबतच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विविध सुविधा एकत्रितपणे उभारल्या जात आहेत. घरगुती व व्यावसायिक वापरासाठी नैसर्गिक वायू पुरवठा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) मार्फत सुमारे ५०० मीटर लांबीची वायू वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

याशिवाय महापालिकेच्या विद्युत यंत्रणांचे स्थलांतर आणि ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे सुमारे ८०५ मीटर लांबीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी १.१४० किलोमीटर लांबीची पावसाळी पाणी निचरा वाहिनी उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे.

Dhule News
Pimpri Chinchwad Disaster Management: पिंपरी-चिंचवड शहर आपत्ती व्यवस्थापनात किती सक्षम? वाढत्या उंच इमारतींमुळे आव्हाने वाढली

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, नैसर्गिक वायू वाहिनी, पावसाळी निचरा वाहिनी आणि काँक्रीट रस्त्याची कामे सध्या वेगाने सुरू असून, नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुंबई नाका, गडकरी चौक आणि त्र्यंबक नाका हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या मार्गाला सर्व आवश्यक पायाभूत सुविधांनी सुसज्ज करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news