Mumbai Agra Highway Accident | कारच्या धडकेत चिमुकल्यासह आजोबा जखमी

Mumbai Agra Highway Accident | चिंचवे शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली.
Accident
Accident
Published on
Updated on

देवळा : पुढारी वृत्तसेवा

चिंचवे शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील आजोबा व नातू जखमी झाले चिंचवे शिवारातील जिओ पंपाजवळील रस्ता दुभाजक परिसरात हा अपघात झाला. मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाणारी कार (एमएच १९, सीयू ४५२६) हिने दुचाकी (एमएच ४१, एव्ही ४२०७) ला धडक दिल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले.

Accident
Transgender Dispute | तृतीयपंथीय महामंडलेश्वर यांच्यावर जीवघेणा हल्ला

अपघातात जखमी चिंचवे येथील रहिवासी जिभाऊ दादाजी पवार आणि त्यांचा चार वर्षांचा नातू रस्त्यावर फेकले जाऊन जखमी झाले. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी बजरंग रुग्णवाहिकेला संपर्क साधला व जखमींना उपचारासाठी चांदवड येथे हलविले.

अपघातानंतर देवळा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक नंदा पाटील, नितीन बाराहाते आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा करून पुढील कार्यवाही केली.

Accident
Sangli Crime: राजकीय दबाव, पोलिस निष्क्रियतेचा बळी

दरम्यान, कारमधील चालक व महिलेने सतत हॉर्न वाजवत होतो; मात्र दुचाकीस्वारांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार अपघात घडणाऱ्या या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महामार्गावरील वेगाचा खेळ थांबला नाही तर पुढचा बळी कोणाचा? असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला. दरम्यान, वाहनचालकांनी वेगाची मर्यादा पाळावी, असे आवाहन देवळा पोलिसांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news