Transgender Dispute | तृतीयपंथीय महामंडलेश्वर यांच्यावर जीवघेणा हल्ला

Transgender Dispute | जखमी करत लुटले सोन्याचे दागिने; तीन हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
Dahanu Crime News
डहाणूत करणीच्या संशयातून दाम्पत्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्लाpudhari photo
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर येथील एका तृतीयपंथीय महामंडलेश्वर यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला करून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लुटल्याची घटना शिंदेगावजवळील ब्राह्मणवाडा फाटा परिसरात घडली. या प्रकरणी सहा संशयित आरोपींपैकी तिघांना नाशिकरोड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात दाखल केले असता एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Dahanu Crime News
Kosari Double Murder Case : साक्ष द्यायला निघाला... अन्‌‍ जिवाला मुकला

शुभांगी रमेश शिंदे (31, रा. कानडी मळा, सिन्नर) या महामंडलेश्वर किन्नर आखाड्याच्या पुजारी आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांच्या सहकारी किन्नर आणि इतर व्यक्तींमध्ये वाद झाला होता. त्यातून संबंधितांनी धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

गुरुवारी (दि. 11) रात्री सुमारे 9 वाजता शुभांगी शिंदे या सहकारी गायत्री पवार यांच्यासोबत आपल्या बहिणीची लसपत्रिका देण्यासाठी दुचाकीवरून कोटमगावकडे जात असताना ब्राह्मणवाडा फाट्याजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडविली. दोघांनी मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा तसेच गळ्यातील सुमारे 47 ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप केला आहे.

हल्लेखोरांनी धमकावून धार्मिक आणि वैयक्तिक स्वरूपाची आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचाही दावा फिर्यादीने तक्रारीत केला आहे. या हल्ल्यामागे सलमा, रागिनी, स्वाती आणि सोनाली यांनी कट स्वल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अतुल चौधरी तपास करत आहेत.

किन्नर जिहाद !

गेल्या अनेक महिन्यांत बिदागी मागण्याच्या हद्दवादातून व हिंदू-मुस्लीम किन्नर जिहाद यावरून अनेक वेळा वाद झाले, तर याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हेदेखील दाखल झाले आहे. नाशिक शहरात मोर्चा देखील निघाला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार संशयित आरोपी सलमा ही किन्नरांचे धर्मांतरण करत असते आणि मुस्लीम किन्नर हिंदू किन्नरांमध्ये धर्मांतरण करते, असा आरोपदेखील केला आहे.

Dahanu Crime News
Sinnar Fraud News | महिलेला गंडा घालून 60 हजारांचे दागिने लंपास

जखमी महामंडलेश्वरवर उपचार सुरू

हल्ल्यात जखमी झालेल्या शुभांगी शिंदे यांना ३६ टाके पडले असून, त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून हल्लेखोरांचा शोध सुरू करत सकाळच्या सुमारास तिघांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पोलिसांनी संवेदनशील घटना हाताळली

रात्री उशिरा घडलेल्या घटनेमध्ये सर्व किन्नर नाशिकरोड पोलिस स्टेशन येथे जमा झाले. त्यांनी आमच्या साथीदाराला सोडा यासाठी गोंधळ घातला होता, पण त्यांनी सामंजस्याची भावना दाखवत या संवेदनाशील प्रकरणाला चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यात सकाळी संशयित आरोपी राधिनी, स्वाती, सोनाली यांना अटक केल्याने काहीसा वाद निवळला, पण दिवसभर पोलिस स्टेशन येथे किन्नर हजर होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news