MPSC 2026 Revised Exam Schedule | लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांची घोषणा

MPSC 2026 Revised Exam Schedule-लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांची घोषणा
MPSC Persentile
Pudhari
Published on
Updated on

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२६ मधील विविध विभागांच्या ३०५८ जागांच्या भरतीसाठी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवारांना परीक्षेच्या तयारीसाठी निश्चित नियोजन करता यावे, प्रशासकीय कारणांमुळे काही परीक्षांच्या तारखांत बदल करण्यात आल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

MPSC Persentile
Government Hospital Star Rating |राज्यात शासकीय रुग्णालयांना मिळणार आता 'स्टार रेटिंग'..!
Admin

आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विविध विभागांतील पदांसाठी ऑफलाइन ओएमआर पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत. संबंधित पदांची जाहिरात, परीक्षा दिनांक, निकाल आणि मुलाखत प्रक्रियेबाबतची अद्ययावत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.

Admin

दरम्यान, काही पदांच्या परीक्षांच्या तारखांमध्ये सुधारणा करण्यात आल्याने उमेदवारांना नव्या वेळापत्रकानुसार तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षेसंदर्भातील पुढील सूचना, प्रवेशपत्रे व इतर तपशील आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.

MPSC Persentile
QR Code Ration Card System | पारंपरिक रेशन कार्डऐवजी क्यूआर कोड प्रणाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news