Nashikroad Jail Road Crime 2026 |उघड्यावर दारू पिण्यास विरोध; महिलेवर कोयत्याने हल्ला

Nashikroad Jail Road Crime 2026 | जेलरोड मोरे मळा परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद, भीतीचे वातावरण
alcohol and gut health
alcohol and gut health FIle Photo
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जेलरोड येथील मोरे मळा परिसरात उघड्यावर दारू पिण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या मुलावर कोयता व विटेने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (दि. २३) रात्री १० च्या सुमारास घडलेली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

alcohol and gut health
Kolhapur Robbery | शित्तूर वारूणमध्ये दरोडा; आईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले: मुलास मारहाण करून दरोडेखोर फरार

जेलरोड परिसरात मागील काही दिवसांपासून कोयते, तलवारी घेऊन फिरणे, मारामारी, चोरी यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यातच रात्रीच्या वेळी उघड्यावर मद्यपान करणाऱ्या टवाळखोरांचा त्रास वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी रात्री उघड्यावर दारू पिणाऱ्या काही जणांना रहिवासी आशा माने यांनी मद्यपान करू नका, अशी समज दिली. याचा राग मनात धरून संशयित प्रथमेश माने व भय्या उज्जैनवाल यांनी त्यांच्यावर कोयत्याने व विटेने हल्ला केल्याचा आरोप आहे. तसेच मुलगा श्याम माने याच्यावरही हल्ला करण्यात आला असून, त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.

alcohol and gut health
Kalyan Crime : कल्याणच्या खडेगोळवलीत रक्तरंजित थरार! वडिलांना सोडून परतणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला

संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. जेलरोड भागात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

नागरिकांचा सवाल

उघड्यावर दारू पिणे, हत्यारे घेऊन फिरणे आणि मारामारीच्या घटना वाढत असताना पोलिसांचा धाक कुठे गेला, असा सवाल जेलरोड परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news