Kolhapur Robbery | शित्तूर वारूणमध्ये दरोडा; आईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले: मुलास मारहाण करून दरोडेखोर फरार

शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर वारूण येथील पाटीलवाडीमधील घटना
Robbery
Robbery Pudhari
Published on
Updated on

Shahuwadi Shittur Varun Mother Son Assaulted

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर वारूण येथील पाटीलवाडीमध्ये मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी एका घरावर धाडसी दरोडा टाकत रोख रक्कम व दागिन्यांसह सुमारे ७९ हजार ९२३ रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेत दादा रामचंद्र पाटील व त्यांची आई आनंदी पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत शाहूवाडी पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादा पाटील हे ग्रामपंचायतीत क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. ते आई आनंदी पाटील यांच्यासह घरी होते. वडील रामचंद्र पाटील हे नेहमीप्रमाणे रात्री शेतावर गेले होते.

Robbery
Kolhapur Child Death | २१ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी; अपघातात गंभीर जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

मंगळवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आनंदी पाटील या घराबाहेर गेल्या होत्या. त्या परत घरात येत असताना हातात काठ्या, गज व इतर हत्यारे घेतलेल्या अंदाजे २५ ते ३० वयोगटातील आठ दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यापैकी चौघांनी आनंदी पाटील यांना घेरले, तर इतरांनी दादा पाटील यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील ९,९२३ रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच आनंदी पाटील यांच्या गळ्यातील मंगळसूत्रही जबरदस्तीने काढून घेतले.

दरोडेखोरांनी अल्टो व स्विफ्ट या दोन चारचाकी वाहनांतून येत घराबाहेर गाड्या उभ्या केल्या होत्या. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी दागिने व इतर मौल्यवान वस्तूंचा शोध घेण्यास सुरुवात केली. विरोध केल्याने आई-मुलास मारहाण करण्यात आली.

Robbery
Kolhapur Water Scarcity : शेतकऱ्यांवर पाणीटंचाईचे सावट येण्याची शक्यता

दरम्यान, संधी साधून दादा पाटील हे घराच्या मागील दरवाजातून बाहेर पडले आणि शेजारील घरांकडे धाव घेत मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील तरुण मदतीसाठी धावून आले. याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी घरातील काही वस्तू घेऊन वाहनांतून सोडोलीच्या दिशेने पलायन केले.

घटनेनंतर स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. शित्तूर वारूण, शिराळे खेडे, सोडोली, मालेवाडी आदी गावांतील युवकांनाही दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली. काही तरुणांनी वाहने अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र दरोडेखोरांनी वाहने त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला.

Robbery
Kolhapur News : ऐतिहासिक टाऊन हॉल उद्यानात दुर्मीळ झाडांच्या रोपांची निर्मिती

घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलीस उपनिरीक्षक परशुराम सिरसाठ व अतुल सोनुले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या धाडसी दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news