Maharashtra Kesari Kusti Sankulan | सिन्नरच्या मातीत घडणार राष्ट्रीय दर्जाचे मल्ल

Maharashtra Kesari Kusti Sankulan | अत्याधुनिक महाराष्ट्र केसरी कुस्ती संकुल बांधकामाचे भूमिपूजन
Maharashtra Kesari Kusti Sankulan
Maharashtra Kesari Kusti Sankulan
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्याच्या समृद्ध कुस्ती परंपरेला नवे बळ देणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती संकुल बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. महाराष्ट्र केसरी कुस्ती फाउंडेशन संचालित व डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा सिन्नर - घोटी महामार्गावरील बंधन लॉन्सजवळ आयोजित करण्यात आला होता.

Maharashtra Kesari Kusti Sankulan
Paresh Sheth Thakur Kesari : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने पटकावली गदा

अध्यक्षस्थानी आमदार माणिकराव कोकाटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते. कुस्तीपटू हर्षल यांनी भविष्यात हिंद केसरी किताब मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच हर्षल यांना शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी आमदार कोकाटे यांनी स्वर्गीय मारुतीशेठ बिन्नर यांच्या कुस्ती क्षेत्रासाठीच्या योगदानाची आठवण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या सहकार्यामुळे सिन्नर तालुक्यातील कुस्ती संस्कृतीला मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

Maharashtra Kesari Kusti Sankulan
Drug addiction | अमली पदार्थांची मगरमिठी

तालुक्यातील पारंपरिक कुस्ती संस्कृतीला आधुनिक प्रशिक्षणाची जोड देणारे हे कुस्ती संकुल भविष्यातील मल्लांसाठी प्रेरणास्थान ठरेल, केंद्रीय क्रीडा विभागाकडून त्यासाठी निधी उपलब्ध करू, असे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आश्वस्त केले. संकुलामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, निवास सुविधा उपलब्ध होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्ल घडण्यास मदत होईल अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव शिंदे, नगरसेवक पंकज जाधव, अमोल झगडे, प्रवीण पाळदे, विनायक निनाद, कॅप्टन रामदास शिरोडे, कोंभाळणेचे सरपंच बबन बिन्नर, बाळासाहेब सदगीर, राहुल बेणके, पोपट बिन्नर, बुवाजी बेणके, बबनराव सदगीर आदींसह कुस्तीप्रेमी, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण खर्च स्वतः करणार : आ. कोकाटे

आमदार कोकाटे यांनी यावेळी सांगितले की, या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. या संकुलाच्या उभारणीसाठी लागणारा संपूर्ण खर्च मी स्वतः करणार असून, सिन्नर तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे कुस्ती संकुल लवकरात लवकर कुस्तीपटूंसाठी खुले करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news