Paresh Sheth Thakur Kesari : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने पटकावली गदा

परेशशेठ ठाकूर केसरी स्पर्धेत हरियाणाच्या संदीप कुमारला केले चीतपट
Paresh Sheth Thakur Kesari
मुंबई : किताबासाठीची कुस्ती लावण्यासाठी मैदानात रामशेठ ठाकूर, महेशदादा लांडगे, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर तसेच संयोजक नगरसेवक हॅपी सिंग उपस्थित होते.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरीने पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम खेळाची छाप उमटवत कामोठे येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या परेशशेठ ठाकूर केसरी कुस्ती स्पर्धा स्पर्धेत विजेतेपद पटकावले. किताबासाठीच्या अटीतटीच्या लढतीत त्याने हरियाणाचा पैलवान संदीप कुमारला घुटना डावावर चीतपट करत केले.

किताबाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संदीप कुमारने सुरुवातीपासूनच पवित्रा घेत विजयवर दबाव निर्माण केला. काही क्षणांसाठी त्याने मजबूत पकड मिळवत मैदान झुकवले होते. मात्र अनुभवी आणि शांत चित्ताने खेळणाऱ्या विजयने संयम राखत योग्य संधीची वाट पाहिली.दोन्ही पैलवानांमध्ये तब्बल 15 मिनिटे झुंज रंगली. प्रत्येक डावावर प्रेक्षकांचा श्वास रोखला जात होता.

Paresh Sheth Thakur Kesari
Senior citizens respect | ज्येष्ठांची उपेक्षा नको!

अखेर योग्य क्षण साधत विजय चौधरीने आपल्या खास घुटना डावाचा अप्रतिम वापर केला आणि क्षणार्धात संदीप कुमारला चितपट करत मैदान दणाणून सोडले. या विजयाने संपूर्ण मैदानात जल्लोष झाला. कामोठ्यातील या भव्य कुस्ती स्पर्धेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक कुस्तीची ताकद आणि आकर्षण अनुभवायला मिळाले.

Paresh Sheth Thakur Kesari
Sindhudurg Zilla Parishad | जि. प. सर्वसाधारण सभा केवळ फार्स !

विशेष म्हणजे, सामन्यादरम्यान निवेदकांनी, विजयच्या नुकत्याच झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेमधील उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख करताच उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा आणि घोषणांचा वर्षाव केला. त्यावेळी, विजय चौधरी विजय चौधरीअशा घोषणांनी संपूर्ण मैदान दुमदुमून गेले.

दमदार विजयाने मिळवली प्रेक्षकांची वाहव्वा

विजेता विजयला मानाची चांदीची गदा तसेच रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. याच मैदानात झालेल्या अन्य लढतींमध्ये किरण भगत आणि सिकंदर शेख यांनीही दमदार विजय मिळवत प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली. कामोठ्यातील या भव्य कुस्ती स्पर्धेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक कुस्तीची ताकद आणि आकर्षण अनुभवायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news