Automobile Industry Crisis | युद्धाचा 'बीएस-6 डिझेल इंजीन' निर्मितीला फटका

Automobile Industry Crisis | इंडस्ट्रियल ग्रेड युरियाचा पुरवठा प्रभावित : ऑटोमोबाइल क्षेत्राने घेतली धास्ती
Industry
IndustryPudhari
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात सर्वाधिक झळ देशातील ऑटोमोबाइल उद्योगाला बसत आहे. एलपीजीसह अन्य इंधनाची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने, त्याचा थेट परिणाम उत्पादनांवर होत आहे. 'बीएस-६ डिझेल इंजीन' साठी लागणाऱ्या इंडस्ट्रियल ग्रेड युरियाचा पुरवठा प्रभावित झाल्याने, उत्पादन प्रक्रियेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शिवाय, बीएस-६ डिझेल इंजीन असलेली वाहने तत्काळ मिळविणे अवघड होणार आहे.

Industry
Harshwardhan Kharat | भोंदू खरातच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात! तासाभराच्या चौकशीनंतर सुटका; नाशिकमध्ये खळबळ

इराण-इस्रायल, अमेरिका यांच्यात गेल्या २८ फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. महिनाभरापेक्षा अधिक काळापासून युद्ध धुमसत असल्याने, पश्चिम आशियात मोठे संकट निर्माण झाले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा एलपीजी आणि इंधनाच्या मार्गावरच इराणने अडथळे निर्माण केल्याने, त्याचा मोठा परिणाम गॅस आणि इंधनपुरवठ्यावर होत आहे.

देशातील ऑटो इंडस्ट्री यात सर्वाधिक होरपळून निघत असून, आता उत्पादनालाच ब्रेक लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने २०२० पासून डिझेलवर धावणाऱ्या वाहनांना 'बीएस-६ इंजीन'चे निकष लागू केले आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी अशा प्रकारचा त्यावेळी निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, या इंजीन निर्मितीसाठी लागणाऱ्या 'इंडस्ट्रियल ग्रेड युरिया' पुरवठा युद्धामुळे प्रभावित झाल्याने, युरियाच्या किमतीत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यात विविध ऑटोमोबाइल कंपन्यांच्या ११ प्रकल्पांमध्ये 'बीएस-६ डिझेल इंजीन'ची निर्मिती केली जाते. बस, ट्रक आणि अन्य डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये हे इंजीन बसविले जाते. या इंजीनासाठी लागणाऱ्या इंडस्ट्रियल ग्रेड युरियाचा ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पुरवठा दुबई आणि इजिप्तच्या बंदरातून केला जातो. मात्र, सध्या शिपिंग मार्गात अडथळे निर्माण झाल्याने, ऑटोमोबाइल क्षेत्र यामुळे धास्तावले आहे.

इंजीनमध्ये ३२.५ टक्के वाटा

डिझेल एक्झॉस्ट फ्लुईड एक असे सोल्युशन आहे, जे ३२.५ टक्के हाय प्युरिटी इंडस्ट्रियल युरिया आणि ६७.५ टक्के डिआयोनायज्ड वॉटरपासून तयार केले जाते. हे इंजीन हानिकारक नायट्रोजन आणि वॉटर वेपरचे विघटन करते. डीईएफ टैंक खाली झाल्यानंतर वाहनांचे इंजिन कंट्रोल युनिट ऑटोमॅटिक लिम्प मोडमध्ये जाते. यामुळे वेग आणि पॉवरमध्ये मोठी कमतरता येऊ शकते. इंजीन बंद केल्यानंतर जोपर्यंत या फ्लुईडला रिफिल केले जात नाही, तोपर्यंत सिस्टिम इंजीन पुन्हा स्टार्ट होऊ शकत नाही. त्यामुळे युरियाच्या शिवाय एक मॉडर्न डिझेल वाहन नीटपणे काम करू शकत नाही.

Industry
IAS Officer Connection | प्रशासकीय वर्तुळात भूकंप! भोंदू खरातकडून महिला आयएएस अधिकाऱ्यासाठी 'जिल्हाधिकारी' पदाचे लॉबिंग?

वर्षभरात दोन लाख इंजीननिर्मिती

१ एप्रिल २०२० मध्ये इंजीनसाठी बीएस-६ निकष लागू केले होते. या नियमांमुळे डिझेल इंजीनमधील नायट्रोजन ऑक्साइड उत्सर्जन ७० टक्क्यांपर्यंत कमी झाले होते. जेव्हा हा नियम अस्तित्वात आला, तेव्हा अनेक कंपन्यांनी डिझेल वाहननिर्मितीला नकार दिला होता. मात्र, ग्राहकांची मागणी बघून, सर्व वाहन उत्पादकांनी डिझेल इंजीन तंत्रज्ञान अद्ययावत केले. देशातील एका मोठ्या वाहन उत्पादक कंपनीकडून २०२२ या वर्षात तब्बल दोन लाख बीएस-६ डिझेल इंजीनची निर्मिती केली होती.

बीएस-६ डिझेल इंजीन निर्मितीला आवश्यक असणाऱ्या इंडस्ट्रियल ग्रेड युरियाच्या किमतीत ३० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या किमती वाढण्याचा अंदाज आहे. तूर्त युरिया पुरवठ्यावर फारसा परिणाम झाला नसला तरी, युद्ध आणखी काही दिवस चालल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होईल.

- राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, आयमा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news