Harshwardhan Kharat | भोंदू खरातच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात! तासाभराच्या चौकशीनंतर सुटका; नाशिकमध्ये खळबळ

Harshwardhan Kharat | प्रकरणात तपासाला वेग आला असताना त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात याला विशेष तपास पथकाने ताब्यात घेत आणि काही तासांतच सोडून देण्यात आले.
Ashok Kharat case
भोंदू खरातचा मुलगा ताब्यात
Published on
Updated on

नाशिक : भोंदू अशोक खरात

प्रकरणात तपासाला वेग आला असताना त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात याला विशेष तपास पथकाने ताब्यात घेत आणि काही तासांतच सोडून देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एसआयटीच्या पथकाने हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेतले.

Ashok Kharat case
Ashok Kharat Nashik Case | भोंदू खरातला दोन डॉक्टरांची साथ! लैंगिक शोषणाचे 'पाप' लपवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा

शिर्डी येथे भूखंड बळकावल्याच्या प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिस व एसआयटीचे पथक तिच्या शोधात होते.

दरम्यान, पथकाने कर्मयोगीनगर येथील तृप्ताबाला या निवासस्थानी धाड टाकली. मात्र, तेथे कल्पना खरात आढळून आली नाही. त्याऐवजी तिचा मुलगा हर्षवर्धन अशोक खरात हा उपस्थित असल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला महाराष्ट्र पोलिस अकादमी परिसरातील कार्यालयात नेत सखोल चौकशी करण्यात आली.

Ashok Kharat case
IAS Officer Connection | प्रशासकीय वर्तुळात भूकंप! भोंदू खरातकडून महिला आयएएस अधिकाऱ्यासाठी 'जिल्हाधिकारी' पदाचे लॉबिंग?

चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती मिळाल्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी अधिकृतरीत्या याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर काही तासांतच हर्षवर्धन खरात याला सोडून देण्यात आले.

दरम्यान, कल्पना खरात अद्याप फरार असून, तिचा शोध सुरू आहे. शिर्डी प्रकरणातील इतर दोन आरोपींना अटक करत न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news