Bhavali Dam Tourist Attack |"भावली धरण परिसरात पर्यटकांवर जीवघेणा हल्ला!नाशिक ग्रामीण पोलिसांकडून 9 आरोपी जेरबंद"

Bhavali Dam Tourist Attack |या प्रकरणातील आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भावली धरण परिसरात पर्यटनास गेलेल्या महाजन कुटुंबावर जीवघेणा हल्ला करीत महिलेचा विनयभंग, लूट आणि तब्बल २० किलोमीटरचा पाठलाग करून कारवर दगडफेक करणाऱ्या टोळीतील ९ जणांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

Arrested
Tilari Ghat Crime | तिलारी घाटातील महिलेच्या खून प्रकरणाचा छडा; कर्नाटकातील बाप-लेकांसह तिघांना अटक

आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देतानाच या टोळीक्यावर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाईसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विमला एम., इगतपुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम बाळप, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे उपस्थित होते.

नाशिकरोड परिसरातील महाजन कुटुंब भावली धरण परिसरात मंगळवारी (दि. १४) पर्यटनासाठी गेले होते. धबधबा पाहताना दोन युवकांनी कुटुंबातील महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर पतीची सोन्याची साखळी व मोबाईल हिसकावून घेत मारहाण केली.

Arrested
Dhule News | शिंदे शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या महिला उपनेत्याने ठाकरे गटाच्या महिलांना काळी जादू करण्याची दिली धमकी!

जीव वाचवण्यासाठी महाजन कुटुंब कारने नाशिकच्या दिशेने निघाले होते. मात्र, आरोपींनी त्यांच्या वाहनाचा २० किलोमीटर पाठलाग करीत लोखंडी व लाकडी दांडक्यांनी कारच्या काचा फोडल्या. दगडफेक करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घोटी टोलनाक्यावरही काही जणांनी हल्ल्याचा प्रयत्न केला.

या कुटुंबाने अंबड पोलीस ठाण्यात जात माहिती दिली. गुन्हा दाखल करीत तो इगतपुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा ठावठिकाणा शोधण्यात आला. काही आरोपी वाडा, भिवंडी परिसरात, तर काही लॉजमध्ये बनावट नावाने वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.

Arrested
Lohagad Case: लोहगडावर धक्कादायक खून उघड; होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलून संपवल्याचा आरोप

ताब्यात घेतलेले संशयित

  • विशाल भटाटे (वय २७, रा. गिरणारे)

  • अनिकेत मानवेढे (वय २४, रा. गिरणारे)

  • अनिरुद्ध भागडे (वय २५, रा. नांदगाव सडो)

  • विनोद बोराडे (वय २६, रा. इगतपुरी गावठा)

  • सागर गिते (वय २२, रा. माणिकखांब)

  • सचिन आडोळे (वय २९, रा. माणिकखांब)

  • अर्जुन आडोळे (वय २५, रा. माणिकखांब)

  • देवीदास भगत (वय २५, रा. बलायदुरी)

  • अजय दालभगत (वय २०, रा. देवळे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news